भविष्यात शिर्डी सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाईल : काका कोयटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 2, 2021

भविष्यात शिर्डी सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाईल : काका कोयटे

 भविष्यात शिर्डी सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाईल : काका कोयटे

राज्य पतसंस्था फेडरेशनची 32 वी वार्षिक सर्व साधारण उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्य पतसंस्था फेडरेशनने लॉकडाऊन काळातही उल्लेखनिय काम केले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे पतसंस्था फेडरेशनला नुकतेच शासनाची अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच फेडरेशनला पूर्ण राज्यात 101 चे वसूलीचे दाखले देण्याची परवानगी नुकातीचे राज्य शासनाने दिली आहे. ही अहवाल सालातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. या प्रशिक्षण केंद्रा मुळे भविष्यात शिर्डी हे क्षेत्र सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाणार आहे, असा विश्वास व्यक्त करत काका कोयटे यांनी व्यक्त केला.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची 32 वी वार्षिक सर्व साधारण सभा शिर्डी येथे फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, फेडरेशनचे महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर, संचालक चंद्रकांत वंजारी, सर्जेराव शिंदे, भारती मुथा, अ‍ॅड.अंजली पाटील, शिरीष पुरोहित आदींसह राज्यातून 26 जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतीनिधी उपस्थित होते.
काका कोयेटे पुढे म्हणाले, 2020 -21 वर्षाचा वार्षिक अहवाल सदर करताना अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, गेल्यावर्षी आलेले संकटात व लॉकडाऊन सुरु झाल्या पासून आज पर्यंत राज्यातील एकही पतसंस्था अडचणीत आलेली नाहीये. राज्यातील पतसंस्थांनी जनतेचा मिळवलेल्या विश्वासाची ही पावती आहे. या आर्थिक वर्षात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत. पतसंस्था फेडरेशनला पूर्ण राज्यात 101 चे वसूलीचे दाखले देण्याची परवानगी नुकातीचे राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे आता केवळ 30 दिवसात पतसंस्थांना 101  चे दाखले मिळणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पतसंस्था फेडरेशनला राज्य शासनाची अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे. यशदाच्या धर्तीवर आता शिर्डी येथील प्रशिक्षण केंद्रात जगतीच दर्जाचे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कार्माचारींसाठी नित्यनियमाने सर्व सोयींयुक्त प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करता येणार आहे. पतसंस्था चळवळीला बळकटी आणण्यासाठी ‘व्हिजन 25’ ही अभिनव संकल्पना पतसंस्था फेडरेशन आता राबवणार आहे. नवनवे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आता सर्व पतसंस्थांचा कारभार आधुनिक होणार आहे. या दृष्टीने नियोजन झाले आहे. करोनाचा कालावधी नंतर आता पुन्हा नव्या जोमाने कामास सुरवात केली आहे. फेडरेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी विषय मांडले. आभार राजूदास जाधव यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here