वृद्ध महिलेस लुटणारा सराईत, गुन्हेगार 24 तासाच्या आत गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

वृद्ध महिलेस लुटणारा सराईत, गुन्हेगार 24 तासाच्या आत गजाआड.

 वृद्ध महिलेस लुटणारा सराईत, गुन्हेगार 24 तासाच्या आत गजाआड.

तलाठी असल्याचे भासवून महिलेस लुटले...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मी वाळुंज गावचा तलाठी असून तुमचे बँकेत पीक विम्याचे 70,000 रु आले आहेत असे खोटे सांगून एका वृद्ध महिलेस बळजबरी रिक्षात बसवून सोने व रोख रक्कम लुटणार्‍या ज्ञानदेव हरिभाऊ चेंडे (वय 37 वर्षे रांजणगाव रोड) या सराईत गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, काल दुपारी 12.00 वा.चे सुमारास फिर्यादी शांताबाई सोपान मोरे (वय 65 वर्षे धंदा शेती वाळुंज बायपास वाळुंज ता नगर जि अहमदनगर) हे त्यांची बहीण कलाबाई असे यांचे राहुरी या ठिकाणी नाकाचे हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी माळीवाडा बस स्टँड मध्ये राहुरी येथे जाणारी बस पाहण्यासाठी जात असताना एका अनोळखी इसमाने ओळख नसताना मी तुम्हाला ओळखत आहे. तसेच मी वाळुंज गावचा तलाठी आहे असे म्हणून तुमचे बँकेचे पिक विम्याचे 70,000 रु आलेले आहेत असे सांगून तिला रिक्षामध्ये बळजबरीने बसवुन पुणे स्टँड या पाठीमागे रिक्षामध्ये बसवून घेऊन जाऊन तिच्याकडून 2,000 रु रोख रक्कम घेऊन त्यानंतर तिच्या गळ्यातील 64 मनी असलेली सोन्याची पोत 35,000 रु किमतीचे बळजबरीने चोरून घेऊन गेला आहे. दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस स्टेशन 553/2021 भादवि कलम 365 व 392 प्रमाणे दिनांक 2/8/2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची चक्रे फिरवून गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना तपासा बाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे माळीवाडा भागात आरोपीचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना गुन्ह्यातील आरोपी हा अरणगाव परिसरात आला अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीला मोठ्या शिताफीने तात्काळ ताब्यात घेतले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचा अधिक विश्वासात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (वय 37 वर्षे मुळ रा.पुणेवाडी ता पारनेर जि अहमदनगर हल्ली हनुमान नगर शुभलक्ष्मी हॉटेल जवळ अरणगाव रोड अहमदनगर) असे असल्याचे सांगून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याचे ताब्यात गुन्हातील 35,000 रु किमतीची एक 64 मणीं, 2,000 रु रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये चार नोटा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर, मनोज कचरे, योगेश भिंगर्दिवे, नितीन शिंदे, सागर पालवे, नितीन गाढवे, शाहिद शेख, बंडू भागवत, भारत इंगळे, सुजय हिवाळे ,तानाजी पवार, सुमित गवळी, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुशील वाघेला यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment