फिर्यादीचा बँक घोटाळ्यात सहभाग शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 5, 2021

फिर्यादीचा बँक घोटाळ्यात सहभाग शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण.

 फिर्यादीचा बँक घोटाळ्यात सहभाग शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण.

फसवणूक झाल्याची तक्रार देणारे 3 डॉक्टर गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सप्टेंबर 2018 मध्ये नगर शहर सहकारी बँकेतील 17 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण बोगस असल्याचे उघड झाले राहुरीतील डॉ रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपुर मधील उज्वला रवींद्र कवडे, नगर मधील विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तीन डॉक्टरांनी शहर बँकेचे संचालक मंडळ व अन्य 26 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता पण “कानून के हाथ लंबे होते है” चा प्रत्यय त्यांना आला. त्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची खात्री आर्थिक गुन्हे शाखेश्र झाल्यानंतर काल या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखा गेल्या अडीच वर्षांपासून या गुन्ह्या तपास करीत आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत डॉ. शेळके व योगेश मालपाणी या दोघांना अटक केली आहे. शेळके विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. गुन्ह्यात नाव असलेले संचालक व बँकेतील अधिकार्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. आता मात्र, थेट फिर्यादींच्या पतीला आणि स्वत: फिर्यादीलाच अटक झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा ठपका नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठेवला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे या तिघांची प्रत्येकी 5 केाटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली, अशी या 3 डॉक्टरांनी दिली होती. अशी फिर्याद या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस तपासात तीन डॉक्टरांचा समावेश आढळून आला आहे. त्यानुसार डॉ. रोहिणी सिनारे यांच्या फिर्यादीत या तीन डॉक्टरांना वर्ग करून घेत अटक करण्यात आली आहे. दरम्यान शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी धरून डॉ. निलेश शेळके याने अपहार केल्याची बाब तिघे डॉक्टर व त्यांच्या पत्नींनी चव्हाट्यावर आणली होती. पण आता या 3 डॉक्टरांचा सहभाग या प्रकरणात दिसून आला आहे.

No comments:

Post a Comment