सिमेंट बाकडे, प्रस्ताव रद्द करा!मनसे सचिव नितीन भुतारेंची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, August 5, 2021

सिमेंट बाकडे, प्रस्ताव रद्द करा!मनसे सचिव नितीन भुतारेंची मागणी.

 सिमेंट बाकडे, प्रस्ताव रद्द करा!मनसे सचिव नितीन भुतारेंची मागणी.

हजारो सिमेंट वाकडे बसवितात फक्त टक्केवारीसाठी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील रस्त्यांवर.. उद्यानात.. मोकळ्या जागेत.. खाजगी जागेत.. नगरसेवकांच्या वार्डात.. नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचा बाकडे बसविणे हा चांगला उपक्रम आहे पण हे बाकडे बसविल्यानंतर त्याची निगा व बसविलेल्या ठिकाणी त्याची खरी आवश्यकता आहे काय हा संशोधनाचा विषय आहे. आता शहरातील नगरसेवकांनी पुन्हा सिमेंट बाकडे बसविण्याची मागणी केली आहे त्याला मनसेने आक्षेप नोंदविला आहे फक्त टक्केवारीचा मलिदा खाण्यासाठी सिमेंट बाकडे बसविण्याची मागणी केली जात आहे. असा आरोप मनसे सचिव नितीन भुतारे यांनी केला असून सिमेंट बाकड्यांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.
सिमेंट बाकडे फक्त उद्यान आणि महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत बसविण्यात यावे असा नियम असताना देखिल अनेक खाजगी जागेत बाकडे बसविण्याचे काम महानगरपालिका तसेच नगरसेवक यांच्याकडून झाले आहे. त्यामुळे संपूर्ण    नगर शहरात आधीचे बसविलेल्या बाकड्यांचे ऑडिट करून खाजगी जागेतील बाकडे ताब्यात घेउन ते उद्यान व महानगर पालिकेच्या मोकळ्या जागेत बसवावेत तसेच नव्याने असलेले सर्व प्रस्ताव रद्द करून हा पैसा नगर शहराती खराब झालेल्या रस्त्यांकरिता लावावा आपण आयुक्त या नात्याने या प्रकरणात लक्ष्य घालून हा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. महानगर पालिका जनतेचा पैसा वाया जाणार नाही असे मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी महानगरपालिका आयुक्त दिले आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना देखिल मुरूम खरेदी महानगरपालिकेकडून केली जाते यामध्ये सुध्धा मोठया प्रमाणावर गरज नसतांना मुरूम खरेदी केला जातो त्यामूळे जिथे गरज आहे तिथेच मुरूम खरेदी करावी अशी मागणी सुध्दा मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.  शहारत खाजगी जागेत, रस्त्यावर , रस्त्यांच्या कडेला, उद्यानात,  मोकळ्या जागेत हजारो सिमेंट बाकडे बसविलेले असताना पुन्हा हजारो बाकड्यांची मागणी नगर शहारातील विविध भागातील नगरसेवकांनी महानगर पालिकेला केली आहे. परंतु आज जर पहिले तर अहमदनगर शहरात जागोजागी बाकडे बसविलेले आहेत हे दिसत असताना देखील फक्त टक्केवारीचा मलिदा मिळविण्यासाठी काही नगरसेवकांनी, पदाधिकारी यांनी सिमेंट बाकड्यांची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here