कोरोनाचे महासंकट लवकर दूर व्हावे- महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

कोरोनाचे महासंकट लवकर दूर व्हावे- महापौर.

 कोरोनाचे महासंकट लवकर दूर व्हावे- महापौर.

वारुळाचा मारुती येथील नागपंचमी व पचंबा यात्रेनिमित्त ध्वजपूजन संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील नालेगाव परिसरातील श्री वारुळाचा मारुती येथे वर्षानुवर्षे नागपंचमी व पचंबा यात्रा  सुरू आहे . परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकटामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम बंद आहे. लवकरात लवकर कोरोनाचे महाभयंकर संकट दूर व्हावे. नागरिकांना आपले आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करता यावेत. आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक आध्यात्मिक व धार्मिकतेची मोठी परंपरा आहे. ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी  आध्यात्मिकता व धार्मिकता समाजाला दिशादर्शक आहे. पुढील वर्षी कोरोनाचे महाभयंकर संकट दूर होऊन आपले धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने पार पाडता यावे. असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले. नागपंचमीनिमित्त नालेगाव येथील वारुळाचा मारुती येथे महापौरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगरसेवक श्याम नळकांडे म्हणाले की, शहरातील ऐतिहासिक सीना नदीच्या तीरावर वारुळाचा मारुतीचे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून त्याची ओळख आहे. या ठिकाणी निजानंद स्वामी. संत जय राम नाना. सिताराम बाबा. कल्याणदास बाबा. रावळे बाबा. या महान साधू संतांची तपश्चर्या व वास्तव्य लाभलेले आहे.  आजही ह.भ.प यशवंत गुंड बाबा यांची मंदिरात 70 वर्षांपासून अखंड सेवा चालू आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर नागपंचमीची पचंबा यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. साधुसंतांनी सुरू केलेली ही नागपंचमी पचंबा यात्रा अखंडपणे चालू राहण्यासाठी आज मंदिर परिसरामध्ये महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. श्रावण महिन्यातील पूजेचा पहिला मान वारुळाचा मारुती मंदिराला मिळत असतो. या परिसराच्या विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. आतापर्यंत 80 टक्के विकास कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे ही लवकरच मार्गी लावू. असे ते म्हणाले
चाप्रसंगी नगरसेवक श्याम नळकांडे. नगरसेवक गणेश कवडे. नगरसेवक सचिन शिंदे. नगरसेविका पुष्पाताई बोरुडे. नगरसेविका सोनाली चितळे. अजय चितळे. संतोष गेन्नाप्पा. बाळासाहेब वाघ. अर्जुन रोहोकले . ह.भ.प सिद्दिनाथ मोरे महाराज. भाऊसाहेब टोणे. संतोष उगले. राम शिंदे. सागर कदम. सुभाष रोहोकले. किशोर वाघ. दर्शन चौधरी. मनोज रोहकले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment