शहर बँक फसवणूक प्रकरणात डॉ. निलेश शेळकेंचा कर्मचारी वाघमारे गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

शहर बँक फसवणूक प्रकरणात डॉ. निलेश शेळकेंचा कर्मचारी वाघमारे गजाआड.

 शहर बँक फसवणूक प्रकरणात डॉ. निलेश शेळकेंचा कर्मचारी वाघमारे गजाआड.


अहमदनगर :
शहर बँकेतील कर्ज फसवणूक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात डॉ. निलेश शेळके याच्याकडील कर्मचारी मधुकर वाघमारे यालाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली.
शहर बँकेतील सुमारे 17 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात पूर्वी डॉ. निलेश शेळकेसह डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, योगेश मालपाणी यांना अटक झालेली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना डॉ. शेळके यांच्या बँक खात्यातील व्यवहार, कर्जांची कागदपत्रे, बँकेतून रकमा काढणे आदी व्यवहारांमध्ये मधुकर वाघमारे याचा समावेश आहे. धनादेशावरील सह्या डॉ. शेळके याच्या असल्या, तरी प्रत्यक्षात बँकेतून व्यवहार वाघमारे याने केलेले आहेत. त्यापोटी त्याला मोबदलाही मिळालेला आहे. त्याच्या खात्यात सुमारे 15 लाखांची रक्कमही वर्ग झालेली आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने वाघमारे याला अटक केली आहे. दरम्यान, वाघमारे याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment