बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

 बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेची लागली वाट!...

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याची वाढ झाली आहे. अवैध व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात चिरी मिरी घेऊन गुटखा, गांजा, जुगार, मटका, ताडी,अवैद्य देशी विदेशी दारू, हात भट्टी, तसेच अवैध वाळू उपसा करणार्‍या या व्यावसायिकांना अभय दिल्याने या अवैध धांद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल बेलवंडी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने होत असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणत सुरू आहे.
बेलवंडी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात गुटखा, गांजा, जुगार, मटका, ताडी,अवैद्य देशी विदेशी दारू, हात भट्टी, मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. तसेच अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याचे समजते. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू व्यवसाइक व स्थानिक नागरिक यांच्यात अनेक वेळा वाद होऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण कार्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे समजते.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री देखील जोरात चालू असून पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक हातभट्ट्या देखील राजरोस पणे सुरू आहेत. परिसरातील हॉटेल व धाब्यावरती जुजबी कारवाई करून  कारवाई केल्याचा फार्स केला जातो. कोरोनाची महामारी असून रोज रुग्ण संख्या वाढत असल्याने  जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले यांनी संध्याकाळी 4 नंतर संचारबंदीचे आदेश दिले असून या काळात हॉटेल तसेच धाब्यावर फक्त पार्सल सुविधा देण्याचे आदेश असताना बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण वाडी, बेलवंडी फाटा, देवदैठण उक्कडगाव, चिंभळा, पिंपळगांवपिसा, विसापूर चिखली येथील ठराविक धाबे तसेच हॉटेल यांना पोलीस मेहेरबान असल्याने या ठिकाणी रात्री उशिरा पर्यंत मागील दाराने चालू असतात. मध्यंतरीच्या काळात उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी विसापूर येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई केली होती  मात्र पोलीस निरीक्षक यांना ही कारवाई रुचली नाही.
अवैध दारू विक्री करणारे तसेच ढाबे, हॉटेलवर विना परवाना दारू विकणारे व्यवसायिक यांच्यावर कोणतीही कारवाई होणारं नाही असे छातीठोक पणें सांगितले कारण वसुली बहाद्दरच्या माध्यमातुन बेलवंडी पोलीसांना महिन्याला मोठा मलिदा देत असल्याची माहिती एका हॉटेल चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

याबाबत महसूल विभागाच्या साहाय्याने आमच्या कारवाया सुरू असून जर अश्या प्रकारचे अवैध व्यवसाय चालू असतील तर बेलवंडी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगून कारवाई करण्याच्या सूचना देतो असे विभागीय पोलिस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment