माझी वसुंधरा स्पर्धेची माहिती देण्यासाठी कर्जतमध्ये प्रशिक्षण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 7, 2021

माझी वसुंधरा स्पर्धेची माहिती देण्यासाठी कर्जतमध्ये प्रशिक्षण

 माझी वसुंधरा स्पर्धेची माहिती देण्यासाठी कर्जतमध्ये प्रशिक्षण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः जगात महामारीने थैमान घातले असताना आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी आपल्यालाच काम करावे लागेल व यासाठी माझी वसुंधरा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विशेष संधी आहे असे प्रतिपादन कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. माझी वसुंधरा स्पर्धेच्या माहितीसाठी या स्पर्धेत सहभागी 11 गावाच्या प्रत्येकी पाच व्यक्तींना कर्जत पंचायत समिती मध्ये खास प्रशिक्षण देऊन गुणांची व स्पर्धेतील पाच क्षेत्राची सविस्तर माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा ही स्पर्धा सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षी कर्जत तालुक्यात राज्यस्तरीय दोन बक्षिसे मिळाली. यामध्ये कर्जत नगरपंचायतने राज्यात दुसरा क्रमांक नगर पंचायत गटात मिळवला तर मिरजगाव ग्रामपंचायतने ही राज्यात दुसरा क्रमांक ग्राम पंचायत गटात मिळवला, यावर्षी माझी वसुंधरा या स्पर्धेच्या दुसर्‍या वर्षीच्या स्पर्धेत सर्वच ग्राम पंचायतींना ही स्पर्धा खुली करण्यात आली असून कर्जत तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे. या गावांना माझी वसुंधरा ही स्पर्धा नेमकी काय आहे यांच्या गुणांची सविस्तर माहिती देण्यासाठी कर्जत पंचायत समिती मध्ये आज खास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी यावर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायती या स्पर्धेत यश मिळवतील व त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जाईल असे म्हटले. यावेळी कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी स्पर्धेच्या टूलकिटची सविस्तर माहिती देताना जल, भूमी, आकाश, अग्नी वायू या पंचतत्वाबाबत बोलताना हे सर्व कामे आपल्या गावात होणार आहेत. यामध्येही स्पर्धेतील बारकाव्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी सहा गट विकास अधिकारी रूपचंद जगताप, विस्तार अधिकारी अविनाश तनपुरे,  मिसाळ, अरुण पुरी, आशिष बोरा, बापू घोडके उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात तालुक्यातील 20 गावात समृध्द गाव या योजने अंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणांत कामे सुरू असून आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या मातोश्री सुनंदाताई पवार या विशेष लक्ष देऊन खास टीमच्या माध्यमातून प्रत्येक काम करून घेत आहेत, त्याच बरोबर आता माझी वसुंधरा या स्पर्धेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पर्यावरण सुधारण्यासाठी काम केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here