गॅसवाहिनीच्या मुजोर ठेकेदाराकडून खोदाईचे दगडे रस्त्यावर, वाहन अपघाताचा धोका ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 7, 2021

गॅसवाहिनीच्या मुजोर ठेकेदाराकडून खोदाईचे दगडे रस्त्यावर, वाहन अपघाताचा धोका !

 गॅसवाहिनीच्या मुजोर ठेकेदाराकडून खोदाईचे दगडे रस्त्यावर, वाहन अपघाताचा धोका !

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरु असलेल्या गॅसवाहिनीच्या कामासाठी मुजोर ठेकेदारानी महामार्गावरच पाईपलाईनसाठी नळ्या टाकून चक्क मुरुम रस्त्याजवळच टाकल्यामुळे महामार्गावरच रस्ता अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे मुजोर ठेकेदाराला कोण आवर घालणार असा सवाल निर्माण झाला आहे.
रस्ता खोदाई करतांना या ठेकेदाराकडून दगडगोटे महामार्मावर पडत असल्यामुळे अपघाताचे संकट उभे राहीले असून प्रशासनाकडून या मुजोर ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांसह जनतेतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here