निकृष्ट मोबाईल बदलून द्या, अन्यथा उग्र आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

निकृष्ट मोबाईल बदलून द्या, अन्यथा उग्र आंदोलन.

 निकृष्ट मोबाईल बदलून द्या, अन्यथा उग्र आंदोलन.

मोबाईल कामांवर आजपासून अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार.


संगमनेर -
कमी क्षमता असणारे 2 जीबी रॅम चे शासनाने राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविकांना 2019 मध्ये देण्यात आलेले मोबाईलची वॉरंटी मे 2021 मध्ये संपली असल्यामुळे ते बदलून देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने शासनाकडे वारंवार केली. तरी शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज पासून मोबाइलच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. तसेच राज्यभर अंगणवाडी कर्मचारी निकृष्ट मोबाइल शासनाला परत देण्याचे आंदोलन करणार आहे.
शासनाने राज्यातील 1 लाख 05 हजार 592 अंगणवाडी सेविकांना 2019 मध्ये मोबाइल दिले होते. या मोबाइलवरून सेविका शासनाला लाभार्थींची वजन, उंची, हजेरी, स्तनदा मातांचा आहार इत्यादी माहिती पाठवत असतात. वॉरंटी संपल्यामुळे मोबाईल व्यवस्थित चालत नाहीत. मोबाइल नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी खर्च येतो. हा खर्च सेविकांकडून वसूल केला जातो. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे मोबाइल बदलून देण्याची मागणी केली. परंतु निधीचे कारण देत सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सेविकांना मोबाइलवरून काम करणे मुश्किल झाले आहे.
23 ऑगस्टला संगमनेर आणि घारगाव प्रकल्प 1, घारगाव प्रकल्प 2 तसेच 24 ऑगस्टला अकोले व राजूर प्रकल्पातील मोबाइल परत करण्यात येतील. असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, सरचिटणीस भारती धरत यांनी सांगितले आहे. सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पूजा घाटकर, इंदुमती घुले, समिना शेख, क्रांती गायकवाड, रेखा अवसरकर, बेबी हरनामे, सुनंदा कदम, अनुसया वराडे, शांताराम गोसावी आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment