जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित

 जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनही चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतीच्या स्वयंघोषणेने हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्याअसून 5 ग्रामपंचायती ओडीएफ प्लस होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी दिली.
याबाबत  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, सन 2018 मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. सध्या जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे  नगर - हिवरे बाजार, राहता - लोणी बु., लोहगाव, राहुरी - गणेगाव, दवंनगाव.      
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 15 मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता- वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृष्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणाची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन या निकषांची पूर्तता करुन ग्रामपंचायती हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) केल्या जात आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हाणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस)च्या निकषांची उत्स्फुर्तपणे पूर्तता करुन स्वच्छता शाश्वत ठेवावी असे आवाहन जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक  परिक्षीत यादव  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment