देशातील सर्वात उंच भगवा खर्डा भूईकोट किल्ल्यावर फडकणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

देशातील सर्वात उंच भगवा खर्डा भूईकोट किल्ल्यावर फडकणार.

 देशातील सर्वात उंच भगवा खर्डा भूईकोट किल्ल्यावर फडकणार.

आमदार रोहित पवार यांची संकल्पना..


जामखेड -
आ. रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या बाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून आणि उत्तम गुणांनीं संपन्न असलेला, 74 मीटरचा, जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज 15 ऑक्टोंबर लावला जाणार आहे.
भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाणार आहे. या ध्वजविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. आणि या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.खर्ड्याच्या किल्ल्यात फडकविण्यात येणार्‍या देशातील किंबहुना जगातील सर्वांत उंच (74 मीटर) अशा भगव्या स्वराज्य ध्वजाचं उपस्थित संत-महंतांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यानंतर पुढील दोन महिने देशभरातील प्रमुख 74 अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे.तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून 15 ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारचं पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment