राजमुद्रा चौकात रस्ता दुभाजकामुळे सहा वाहने अपघातग्रस्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 31, 2021

राजमुद्रा चौकात रस्ता दुभाजकामुळे सहा वाहने अपघातग्रस्त.

 राजमुद्रा चौकात रस्ता दुभाजकामुळे सहा वाहने अपघातग्रस्त.

रस्ता दुभाजकच ठरत आहेत अपघातास कारणीभूत..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
नेवासा फाटा येथे औरंगाबाद नगर रोडवर राजमुद्रा चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास  अत्यंत विचित्र अशा झालेल्या  अपघातात सहा चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.एक वाहन तर अक्षरशः डिव्हायडरवर चढून पलटी होऊन शेजारच्या दुकानात जाता जाता राहिले.अन्यथा फार मोठी घटना या वेळी घडली असती.त्यामुळे या वेळी जमलेल्या नेवासा फाटा येथील व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी रस्तादुभाजक त्वरित काढण्यात यावा अशी मागणी करून आपला संताप व्यक्त केला .  
अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा फाटा येथे रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविले होते.आणि त्यानंतर  अहिल्यादेवी होळकर चौक ,आंबेडकर चौक ,आणि राजमुद्रा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले.आधीच अरुंद रस्ता आणि त्यात बसवलेले रस्ता दुभाजक यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना  कसरत करावी लागत आहे त्याशिवाय पाऊस पडल्यानंतर तर रात्रीच्या वेळी अजिबातच रस्ता दुभाजक लक्षात येत नाही.त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी रस्ता दुभाजक बसवायला विरोधही केला होता.पण त्या विरोधाला न जुमानता रस्ता दुभाजक बसविण्यात आले आणि अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.त्यामुळे आता  हे दुभाजक काढण्यात यावीतअशी मागणी सर्व बाजूंनी होत आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here