पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी ‘ग्रिन एन क्लिन’चा पुढाकार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी ‘ग्रिन एन क्लिन’चा पुढाकार.

 पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी ‘ग्रिन एन क्लिन’चा पुढाकार.

शिर्डीतील गणेश मंडळ सदस्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः जगात सुंदर आणि स्वच्छ शिर्डी करण्याचा ध्यास ग्रिन एन क्लिन शिर्डीने घेतला असून शिर्डीचे पर्यावरण हे साईभक्तांसाठी सदैव प्रेरक राहावे यासाठी सदोदीत प्रयत्न करत असतांना थोड्याच अवधीत गणेशोत्सव होणार असून हा पर्यावरण पुरक व्हावा यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी समस्त शिर्डीतील गणेश मंडळानी सदस्यांनी सहभाग नोंदवण्याचा निर्धार केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्ष अजित पारख, डॉ.जितेंद्र शेळके, माजी विश्वस्त सचिन तांबे, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, गजानन शेर्वेकर, नगरसेवक अशोक गायके, संजय शिर्डीकर, मणिलाल पटेल, ङ अनिल शेजवळ, दादाभाउ काळे, तुकाराम गोंदकर, बाळासाहेब गोंदकर, धनंजय जगताप, सागर वाल्हेकर, सागर कुलकर्णी, मनोज जाधव, अनूप गोंदकर, नितीन महाले, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले की, पर्यावरणाची हानी होवू नये यासाठी शासन स्तरावरही प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून शाडूची माती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असून ही माती विद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्यातुन या विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जावून घरोघर पर्यावरण पुरक गणोशोत्सव साजरा केला जाईल. हे साध्य करण्यासाठी अगोदर नागरीकांनी स्विकारणे आवश्यक आहे. आज त्यांनी स्विकारल म्हणून शिर्डी स्वच्छ होत आहे. माझी वसुंधराचे पारीतोषिक त्यांचच योगदान आहे, यासाठी येत्या नगरपंचायतीच्या बैठकीत हा ठराव मांडणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रिन एन क्लिन शिर्डींच्या लोगोच्या अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी परीमल वेद यांनी पर्यावरण पूरक तुरटीचे गणपती उपस्थितांना दाखवण्यासाठी ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अजित पारख यांनी मानले. तर सुत्र संचालन मणिलाल पटेल यांनी केले.

No comments:

Post a Comment