भाजपचे चाणक्यासह इतर अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

भाजपचे चाणक्यासह इतर अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

 भाजपचे चाणक्यासह इतर अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा संघटन सरचिटनीस म्हणून काम केलेले प्रसाद ढोकरीकर यांनी इतरांसह पुणे येथे आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत कोणतीही अपेक्षा न ठेवता विकास कामांना साथ देन्याचा निर्णय घेतला.                    
आ.रोहित पवार यांचे कर्जत- जामखेड मतदारसंघातील विकासकामे पाहता या विकासकामाना साथ देण्यासाठी भाजपातील  विविध पदाधिकार्‍यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार व युवकचे कर्जत शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे  यांनी दिली.
कर्जत- जामखेड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली. कर्जत तालुक्यात आमदारकी नंतर विविध सत्तास्थाने ही खेचून आणण्यासाठी त्यांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीची चलती सुरू झाल्याने व विकासाची नवी दिशा दिसू लागल्याने भाजपातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याला प्राधान्य दिले आहे. आज दि 30 कर्जतमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. यामध्ये भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून काम केलेले प्रसाद ढोकरीकर, कर्जत नगर पंचायतचे नगरसेवक लालासाहेब शेळके तसेच नुकतेच कर्जत सोसायटीचे व्हॉईस चेअरमन झालेले देविदास खरात व नगरसेविका मंगलताई तोरडमल यांचे चिरंजीव नितीन तोरडमल,  यांनी आज (दि 30 ऑगष्ट) रोजी पुणे येथे आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाचे पदाधिकारी व माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या या सर्वानी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहराचा जो कायापालट होत आहे. त्यांच्या या विकासाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे यावेळी म्हटले. आगामी काळात कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार व युवकचे कर्जत शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, कुंभेफळचे माजी सरपंच संतोष नलवडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment