लसीकरणात भरती प्रक्रियेतील तरूणांना प्राधान्य द्यावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

लसीकरणात भरती प्रक्रियेतील तरूणांना प्राधान्य द्यावे

 लसीकरणात भरती प्रक्रियेतील तरूणांना प्राधान्य द्यावे

 माजी उपसभापती रविंद्र भापकर यांची मागणी

नगरी दवंडी /प्रतिनिधी 
अहमदनगर  : सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरू असुन यात लष्करी भरती प्रक्रियेत सराव करणाऱ्या तरूणांना प्राधान्य देण्याची मागणी नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांच्या कडे केली आहे .
भापकर म्हणाले की ,काही महिन्यातच लष्करी व पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील अनेक तरूण सराव करीत आहेत . लष्करी व पोलिस भरतीसाठी कोरोना लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. ज्यांचे लसीकरण झाले त्यांनाच यात सहभागी होता येणार असुन त्यांचे लसीकरण वेळेत न झाल्यास हे तरूण भरती प्रक्रियेपासुन वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या तरूणांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. ही  बाब भापकर यांनी मांडगे यांच्या लक्षात आणुन दिली. त्यांनीही अशा तरूणांना प्राधान्य देणार असल्याचे मान्य केले असे भापकर यांनी सांगितले . त्यासाठी भरतीसाठी जाणाऱ्या तरूणांनी आपला अर्ज , हमी पत्र , आधारकार्ड आदि कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे भापकर यांनी सांगितले .ज्या तरूणांना भरतीसाठी जायचे आहे त्यांनी लसीकरणासाठी हे कागदपत्रे सादर करावेत अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment