मनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

मनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव.

 मनपा सहकारी पतसंस्था स्व.भांडवली झाल्यामुळे संचालक मंडळाने साजरा केला आनंदोत्सव.

आ. संग्राम जगताप यांचे पतसंस्था स्व भांडवली करण्यासाठी मोठे योगदान.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासदांनी साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्यामुळे पतसंस्था स्व भांडवली झाली असून यासाठी संग्राम जगताप यांचे मोठे योगदान असल्याची भावना चेअरमन बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले आहे. पतसंस्थेच्या या वाटचालीबद्दल सर्व सभासदांनी व संचालक मंडळाने मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी चेअरमन पवार म्हणाले की, 12-6- 2021 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. त्याला सर्व सभासदांनी एक मुखाने मंजुरी दिल्यामुळेच आज आपली मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली झाली आहे. त्यामुळे आता सभासदांनी ठेवलेल्या साडेचार  कोटी रुपये ठेवीतून कर्ज वाटप करता येणार आहे. त्यामुळे मनपा कर्मचारी  पतसंस्था ही भविष्यकाळात सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाईल.  आणि सभासदांना  पतसंस्थेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून मदत करता येईल.
पूर्वी  सभासदांना  कर्ज वाटण्यासाठी जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थेचे कॅश क्रेडिट खाते होते. त्या माध्यमातून सभासदांना लागणारे कर्ज वाटप करण्यात येत होते. पतसंस्थेला नेहमीच जिल्हा बँकेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे सभासदांनी घेतलेल्या कर्जावर  सोळा टक्के व्याज द्यावे लागत होते. 110 वर्षांची परंपरा असलेली मनपा कर्मचारी पतसंस्थाथेवर यापूर्वी एक हाती सत्ता असूनही संस्था स्व भांडवली करण्याकामी कोणीही लक्ष घातले नाही. संस्थेवर कायम कर्ज व सभासद हे कायम कर्जाच्या ओझ्या खाली अशी परिस्थिती होती. संस्थेचे व्याजदरही 16 टक्के पर्यंत गेले होते. आम्ही अवघ्या साडेतीन वर्षात संस्थेत अमुलाग्र बदल करून कर्जावरील व्याजदर 13 टक्के पर्यंत आणला असून. यापुढेही व्याजदर कमी करण्यात येईल अशी माहिती चेअरमन बाळासाहेब पवार व संचालक मंडळांनी दिली.
आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था पूर्णपणे स्व भांडवली करण्यासाठी  मोठे योगदान दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बँकेमध्ये विविध अडचणी येत होत्या त्यांनी  सोडून दिल्यामुळे मनपा कर्मचारी  पतसंस्था दिनांक 13 -8 -2021 रोजी  पूर्णपणे स्व भांडवली झाली असून सभासदांनी साडेचार कोटी रुपये ठेवी ठेवल्यामुळे पतसंस्थेला स्व भांडवलीकडे  वाटचाल करता आली. असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment