अन्न औषध प्रशासनाचा... दूध भेसळ केंद्रावर छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

अन्न औषध प्रशासनाचा... दूध भेसळ केंद्रावर छापा.

 अन्न औषध प्रशासनाचा... दूध भेसळ केंद्रावर छापा.

भेसळयुक्त दूध व पावडर जप्त.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज अन्न व औषध प्रशासन अहमदनगर कार्यालयाने जालिंदर ठकाजी वने यांच्या गोठ्यात वने वस्ती ,ब्राह्मणी ता राहुरी जि अहमदनगर येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून दूध भेसळीसाठी साठविलेली व्हे पावडर 58 किलो, लाईट लिक्विड पॅराफिन 170 किलो व भेसळयुक्त गाईचे दूध 53 लिटर असा एकूण 18,524 रू किं चा साठा जप्त केला.
या भेसळयुक्त गाय दुधाचे, व्हे पावडर व लाईट लिक्विड पॅराफिन चे नमुने विश्लेषणासाठी घेतले असुन भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.  सदर भेसळ कारी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जालिंदर ठकाजी वने हा दररोज 170 लिटर दूध पुढील देत असत प्रत्यक्षात त्याच्या गोठ्यातून 100 लिटर पेक्षा कमी दूध मिळत आहे. उर्वरित दूध श्री जालिंदर वने हा भेसळ करून पुढील 2 डेअरीज मुक्ताई दूध संकलन केंद्र ब्राह्मणी, मे श्रीनिवास दूध संकलन केंद्र शनिशिंगणापूर रोड ब्राह्मणी यांना विहित करीत होता.
 श्री दिगंबर गंगाधर पठारे यांची मे मुक्ताई दूध संकलन केंद्र देवी मंदिर रोड ब्राह्मणी येथे तपासणी करून दुधाचा एक नमुना घेऊन उर्वरित 800 लिटर दूध किं रु 20000 भेसळीच्या कारणावरून नष्ट केले तसेच श्री प्रकाश शिवाजी नगरे श्रीनिवास दूध संकलन केंद्र हापसे गाळा नंबर 2 शनिशिंगणापूर रोड ब्राह्मणी येथे तपासणी करून दुधाचा एक नमुना घेऊन उर्वरित 450 लिटर दूध किं रुपये 11700 भेसळीच्या कारणावरून नष्ट केले. ही  कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुठे शरद पवार, उमेश सूर्यवंशी व प्रीती पवार यांनी सहा.आयु. संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.

No comments:

Post a Comment