15 ऑगस्ट पासून.. स्वातंत्र्य! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 12, 2021

15 ऑगस्ट पासून.. स्वातंत्र्य!

 15 ऑगस्ट पासून.. स्वातंत्र्य!

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत निर्बंध शिथिल.
10 वाजेपर्यंत हॉटेल्स, मॉल्स, दुकाने, जिम सुरू ठेवण्यास परवानगी.

गेल्या काही महिन्यापासून बंद असलेला महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होत आहे. मागील काही महिन्यापासून अनेक आस्थापना बंद होत्या. तर काही ठिकाणी शिथिलथा दिली असली तरी तेथे वेळ देखील कमी होती. त्यामुळे व्यावसायिकांना आपला व्यवसाय करायचा कसा? हा मुळात प्रश्न उभा होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे. राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स 15 ऑगस्टपासून दररोज रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे आता व्यावसायिकांना एक दिलासा मिळाला आहे.याचबरोबर, मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांना देखील परवानगी दिली गेली आहे. परंतु, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स हे स्थळे बंद राहणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती राज्य सरकारने दिली असल्याने व्यवसायिकांना आता व्यवसायासाठी स्वातंत्र्य मिळणार आहे.


मुंबई :
ठाकरे सरकारने राज्यातील जनतेसह विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात आता रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु राहणार आहेत. त्यामुळे हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळालाय. तसेच यासह विवाह सोहळ्यााला 50 पेक्षा अधिकांना उपस्थित राहता येणार आहे. जीम्स आणि मॉल्सही सुरु होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र निर्बंधातून सूट देताना टोपेंनी जनतेला कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलंय.
तसेच तिसर्‍या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशाराही टोपेंनी दिला.
तिसर्‍या लाटेत 700 मेट्रीक टन ऑक्सिजनची ज्या दिवशी गरज लागेल, त्या दिवसापासून लगेच राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, असं टोपेंनी पत्रकार परिषदेरम्यान स्पष्ट केलं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यानंतर टोपेंनी राज्य सरकारच्या वतीने या निर्णयांची घोषणा केली. खुल्या प्रांगणात लग्न सोहळ्याला 200 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर हॉलमध्ये क्षमतेच्या 50 टक्के तसेच जास्तीतजास्त 100 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र सर्व कर्मचार्‍यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले हवेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

काय सुरु राहणार?
  सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू, - हॉटेल, रेस्टॉरंट 50 % क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी, - दुकान, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍यांचे लसीकरण आवश्यक, - शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश, - मंगल कार्यालयांना 50 % क्षमतेत जास्तीत जास्त 100 नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी, - खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांच्या उपस्थितीस मुभा, - खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या 24 तास सुरू ठेवता येणार, - बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी, - जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा 50 % क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, - राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार.

No comments:

Post a Comment