आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 21, 2021

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण

 आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः  आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे खंडोबाच्या मूर्तीची बैलगाडीतुन मिरवणूक काढण्यात आली.कलशपूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.भारतीय लोकांचे दैवत असलेला आणि अठरा पगड जातीचा बहुजन खंडोबा देव, देशाच्या विविध प्रांतात आणि विविध नावारुपाने आढळून येत असतो.भाषा जरी भिन्न असल्या तरी मात्र सर्वांची कुलदैवता एकाच संस्कृतीशी जोडलेली असते.खंडेरायाची मुर्ती बैलगाडीमध्ये ठेऊन संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. खूप दिवसातून असा सोहळा संपन्न झाल्यामुळे ग्रामस्थांनी हा सोहळा एकदम आनंदात साजरा केला.
ब्राम्हणाच्या हस्ते मूर्तीचे पूजन व कलशपूजन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वाहिरा येथील माणिकगडाचे ह.भ.प. गणेश महाराज यांच्या हस्ते मंदिरावर कलश बसवण्यात आला.
यावेळी महिलाभगिनी व वाहिरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  मेघराजानेही जोरदार हजेरी लावली यामध्ये सर्व गावकरी आनंदी झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here