बालविवाहाचा गुन्हा नोंदविण्यात शेवगाव पोलिसांची टाळाटाळ... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

बालविवाहाचा गुन्हा नोंदविण्यात शेवगाव पोलिसांची टाळाटाळ...

 बालविवाहाचा गुन्हा नोंदविण्यात शेवगाव पोलिसांची टाळाटाळ...

गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शेवगाव मधील बालविवाह प्रकरणी मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चाईल्ड लाईन सदस्यांनी काल जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
मुलीचे वडील हे या बालविवाह संदर्भात शेवगाव पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याकरिता गेले असता त्यांनी बालविवाह संदर्भात संपूर्ण हकीकत पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली. त्यांच्या पत्नीसोबत गेल्या 8 वर्षापासून घरगुती वादाच्या कारणात्सव पती-पत्नी विभक्त राहतात. माझ्या पत्नीने अल्पवयीन मुलीचे बालविवाह लाऊन दिले, ते कोठे लावले ते माहीत नाही, तरी आपण माझी तक्रार दाखल करुन घ्या तेव्हा पोलीस निरीक्षक यांनी त्यांना सांगितले कि, तुम्हांला लग्न कोठे झाले हे माहीत नाही, आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण सदर गुन्हा आमच्या हद्दीतील नाही. यावर मुलीच्या वडिलांनी पोलीस निरीक्षक यांना विनंती केली कि, आपण कृपया करून शून्य नंबरने माझी फिर्याद नोंदवून घ्या, यापूर्वीही माझ्या पत्नीने माझ्या मोठी मुलीचेही बालविवाह केलेले आहे. ह्या लहान मुलीचे आयुष्य उध्वस्त होवु नये म्हणून माझी फिर्याद घ्या. तरीही पोलीस निरीक्षक साहेबांनी मुलीच्या वडिलांची फिर्याद घेतली नाही. हे दुर्दैवी व गंभीर प्रकरण पोलीस निरीक्षक यांनी असंवेदनशीलता दाखवल्याने हा बाल विवाह रोखता आलेला नाही व फिर्याद ही न घेतल्याने चाईल्ड लाईन ने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रकरणाची सखोल चौकशी करुन वडिलांची कायदेशीर फिर्याद दाखल करुन घ्यावी. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित अधिकार्‍या वर देखिल योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
‘चाईल्ड लाईन’ हा भारत सरकार व केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय अंतर्गत बालकांसाठी चालवला जाणारा प्रकल्प असून 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, गरीब, गरजू आणि काळजी व संरक्षणाची गरज असणार्‍या बालकांसाठी काम करत आहे. 1098 हा चाईल्ड लाईनचा मोफत क्रमांक आहे. शेवगाव तालुक्यातील *बोधेगाव या गावातील* श्री. पांडुरंग किसन भवार यांचा मुलगा नामे केशव उर्फ सोमनाथ पांडुरंग भवार यांचा विवाह कुढेकर वस्ती वरील राहत्या घरी अल्पवयीन मुलीचे नाव कु. सोनाली उर्फ कल्याणी अंकुश भिलारे  रा. बावी, ता. शेरूर जि. बीड हिच्याशी दिनांक 18/08/2021 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हा  चाईल्ड लाईनच्या 1098 हेल्पलाईन मोफत क्रमांकावर माहिती मिळाली होती. या मुलीचे वय 13 वर्ष 2 महिने आहे. (जन्म दिनांक - 10/06/2008) ही मुलगी अल्पवयीन असल्याने हि महिती मिळताच चाईल्ड लाईन ने तातडीने पोलीस कंट्रोल ला 100 या क्रमांकावर माहिती दिली त्यानंतर शेवगाव पोलीस आणि बोधेगावचे ग्रामसेवक यांनी  सदर घटना स्थळी भेट दिली, पण या ठिकाणी मुलाच्या घरी कोणीही भेटले नाही, घराला कुलूप असल्याचे फोटो आणि असे घरी कोणी न भेटल्याचा अहवाल बोधेगाव या गावाचे ग्रामसेवक यांनी पाठविला. परंतु त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली नाही.  दरम्यान मुलाच्या वडीलांनी, नातेवाईकांनी हा विवाह सोहळा अज्ञात ठिकाणी गुपचूप उरकुन टाकला. या संदर्भात चाईल्ड लाईनने बालविवाह प्रतिबंधक सर्व यंत्रणांना बालविवाह होत असल्याबाबत लक्ष वेधुनही संबंधीत शासकीय यंत्रणेणे गंभीररीत्या हा विवाह सोहळा रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यावरही शेवगाव पोलीस निरीक्षक आता काय कारवाई करतात हे दिसून येणार आहे.

No comments:

Post a Comment