सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांचा मनसेत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांचा मनसेत प्रवेश

 सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांचा मनसेत प्रवेश

पारनेर तालुक्यातील महत्त्वाची जबाबदारी, खेडेकर यांच्या प्रवेशाने पारनेरमध्ये मनसेला बळकटी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे खेडेकर यांच्या प्रवेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पारनेर मध्ये अधिक बळकटी मिळणार असून होऊ घातलेल्या पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी नगर येथे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये प्रवेश केला पारनेर तालुक्यात भाऊसाहेब खेडेकर यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली असून अनेक गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले संघटन कौशल्य व तालुक्यातील तळागाळातील घटकांपर्यंत असलेला दांडगा संपर्क या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत तालुक्यात विविध समाज उपयोगी काम केले आहे 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती या निवडणुकीत यांचा दारुण पराभव झाला मात्र सामाजिक कामांमध्ये त्यांनी खंड पडू न देता कार्य सुरू ठेवले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्यामध्ये सध्या चांगले काम करत असून खेडेकर यांच्या प्रवेशामुळे मनसेला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडत तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत लवकरच भविष्यातील रणनीती आखून कामास सुरुवात करणार आहे. - भाऊसाहेब खेडेकर

No comments:

Post a Comment