दुधाला स्वस्त भाव द्या ! मागणीसाठी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

दुधाला स्वस्त भाव द्या ! मागणीसाठी...

 दुधाला स्वस्त भाव द्या ! मागणीसाठी...

अकोला- दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू
होईल असा लूटमार विरोधी कायदा,साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. आणि प्रक्रिया व विक्री प्रक्रियेतील उत्पन्नात हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर संरक्षण,अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ’एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण,भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी,सदोष मिल्को मिटर वापरून शेतकर्‍यांची आर्थिक लुट करणे थांबावे यासाठी दुध संस्थांना प्रमाणित मिल्को मिटर वापरणे बंधनकारक करा व मिल्को मिटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करा शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करा. अशा विविध मागण्यांसाठी आज क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले. किसान सभेचे कार्यकर्ते या आंदोलनात राज्यभर सहभागी झाली होती. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे व जळगाव या दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रावर निदर्शने करत व दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. लॉकडाऊनचा कांगावा करत राज्यातील दूध कंपन्यांनी दुधाचे दर 15 रुपयांनी पाडत दूध उत्पादकांची लूटमार सुरू ठेवली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात शेतकरी संघटना व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. दुधाचे दर या बैठकीनंतर वाढतील व राज्यात दुधाला एफ. आर. पी. देणारा कायदा केला जाईल असे आश्वासन यावेळी सुनील केदार यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र दीड महिना उलटून गेला तरी दर वाढविण्यात आले नाहीत.

दुधाला एफ. आर. पी. लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने कॅबिनेट नोट बनवून महसूल व सहकार विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविली. मात्र पुढे याबाबतही काही झाले नाही. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे चालविलेल्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांना गावोगावातून हजारो मेल करून दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या मागण्या सरकारला कळविल्या.
शेतकर्‍यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये दर द्या. लॉकडाऊन काळात दुध कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून 20 रुपये दराने दुध घेतले. शेतकर्‍यांना यामुळे खूप नुकसान सहन करावे लागले.
डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, दादा गाढवे, सुधीर रंधे,उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, कविता वरे, दीपक वळे, नंदू रोकडे, जोतिराम जाधव,अमोल नाईक,धनंजय धोरडे, अमोल गोर्डे, अमोल नाईक, सुदेश इंगळे, रमेश जाधव,रामदास वदक, अशोक पटेकर, विकास बगाटे, सूर्यकांत काणगुडे, विजय वाकचौरे, राजू भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

No comments:

Post a Comment