पैशाचे आमिष दाखवून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 9, 2021

पैशाचे आमिष दाखवून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

 पैशाचे आमिष दाखवून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

गुन्हा दाखल, आरोपी गजाआड.

कर्जत ः शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला (रा.मौजे पाटेवाडी) पाचशे रुपयांचे आमिष दाखवून अत्याचार करीत ही बाब तिच्या आईवडिलांना सांगितले तर तुला जीवे ठार मारून टाकील अशी धमकी देणार्‍या नराधमाला कर्जत पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे मोहन जोशी निंबाळकर असे आरोपीचे नाव आहे.
पुन्हा असा प्रकार करण्याचा आरोपी मोहन जोशी निंबाळकर प्रयत्न करत असताना पीडित मुलीच्या बहिणीने हा प्रकार पहिला व तिने आपल्या आई- वडिलांना हा प्रकार कळविला. पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनला माहिती दिली असता तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, ईश्वर माने, संतोष फुंदे, गोरख जाधव, जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून तक्रारीप्रमाणे आरोपीविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here