बेलवंडी फाटा येथे चोराच्या गोळीबारात पतसंस्थेचे व्यवस्थापक जखमी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 7, 2021

बेलवंडी फाटा येथे चोराच्या गोळीबारात पतसंस्थेचे व्यवस्थापक जखमी

 बेलवंडी फाटा येथे 

चोराच्या गोळीबारात पतसंस्थेचे व्यवस्थापक जखमी

नगरी दवंडी / प्रतिनिधी 

 अहमदनगर : पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथील शाखेच्या व्यवस्थापकावर आज (ता.7) दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोळीबार करुन चोराने 5 लाख रुपये लूटले. या घटनेत व्यवस्थापक बाळासाहेब रामचंद्र सोनवणे (रा. सोबलवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्थेची शाखा आहे. नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु असताना, आज दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवर एक जण शाखेत आला. पतसंस्थेत सुमारे १५ लाख रुपयांची रोकड होती. त्यातील पाच लाख रुपये चोराने घेतले.

चोराच्या दहशतीमुळे महिला कर्मचारी घाबरुन बाहेर पळाली. व्यवस्थापक सोनवणे यांनी चोराला ही रक्कम नेण्यास मज्जाव केल्याने त्याने हातातील रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडली. त्यात सोनवणे गंभीर जखमी झाले. त्यानंतर दुचाकीवरुन चोरटा भरधाव वेगात तेथून पसार झाला.

दरम्यान घटणेबाबत माहिती मिळताच, श्रीगोंदा व सुप्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके हेही घटनास्थळी दाखल झाले. चोराच्या शोधार्थ विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here