नुतन महापौरांचा संविधान प्रत भेट देऊन सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

नुतन महापौरांचा संविधान प्रत भेट देऊन सत्कार

 नुतन महापौरांचा संविधान प्रत भेट देऊन सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात नावाजलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदी बिनविरोध निवड  झाल्याबद्दल रोहिणीताई शेंडगे यांचा मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप ससाणे,लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक समिती बोधेगाव अध्यक्ष भगवान मिसाळ, प्राध्यापक अशोक शिंदे सर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, बहुउद्देशिय कामगार संघटनेचे जिल्हाप्रमुख साहेबराव काते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप ससाणे म्हणाले की,महापौर पदी रोहिणी ताई शेंडगे यांची निवड म्हणजे समाजासाठी अभिमानाची बाब असून त्यांनी नगरचा आणि समाजाचा मान वाढविला असुन त्यांच्या कार्यकाळात निश्चितच समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न  सोडविण्यासाठी त्यांच्या उन्नती साठी प्रयत्न करतील अशी आशा आहे.पुढे समाज बांधवांनी त्यांना पुढील वाटचालीस व कार्यास शुभेच्छा दिल्या..

No comments:

Post a Comment