‘निव्वळ आश्वासने नाही तर आम्ही कामेदेखील करतो’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

‘निव्वळ आश्वासने नाही तर आम्ही कामेदेखील करतो’

 ‘निव्वळ आश्वासने नाही तर आम्ही कामेदेखील करतो’

माजी आमदारांचे रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी प्रतिपादन....


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजुरझालेल्या काष्टी अजनुज रस्ता ते  माळवाडी रस्त्याचे आज भुमीपुजन कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक मा.आ. राहुल जगताप यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलाताना जगताप म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्याकडे मागे खुप वर्षे मंत्रीपद असताना देखील तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट होता. तालुक्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते. मी विधानसभा सदस्य असताना रस्त्यांना प्राधान्य देवून चांगले व दर्जेदार रस्ते कसे करता येतील या गोष्टिवर प्राधान्याने भर देण्याचे काम केलेले आहे. तालुक्यातून सर्वच भागातून जाणारे रस्ते दुरुस्तीसाठी अनेक गावांतील सरपंच, चेअरमन व ग्रामस्थ मला आजही भेटतात व सांगत असतात. तालुक्याला खड्डे मुक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. तालुक्यातील इतरही रस्त्यासाठी आणखी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तालुक्यातील जनता हेच माझे दैवत आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करुन देणे हे माझे काम आहे व ते मी निरंतर करतच राहणार आहे. मी कधीही घोषणा करत नाही प्रत्यक्ष मंजूर झालेल्या कामाबददलच जनतेला सांगतो. फक्त सर्वत्र लोकप्रियतेच्या घोषणाबाजी करणे मला आवडत नाही. तो माझा स्वभाव नाही.
या उदघाटन प्रसंगी मा.सभापती बाळासाहेब गिरमकर, राकेश पाचपुते, बापु भुजबळ, नितीन थोरात, योगेशआबा गिरमकर, नाना कणसे, तुकाराम शिपलकर, अमोल गिरमकर, आबातात्या गिरमकर, कायगुडे आण्णा, माऊली जाधव, मोतीराम भुजबळ, किरण गायकवाड, माधव शेळके, महेश कवडे, अनिल भुजबळ, महेश गिरमकर, राहुल पाचपुते, राजेंद्र गिरमकर, हनुमंत क्षीरसागर, पद्मसिंह क्षीरसागर, दत्ता गिरमकर, तेजस शिंदे, मच्छिंद्र जाधव, भानुदास कवडे, सुदामराव कुटे, अजिनाथ गिरमकर, रमेश गिरमकर, भारत भुजबळ दिपक गिरमकर तसेच अजनुज-माळवाडी येथील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा अहमदनगर जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक मा.आ. राहुलदादा जगताप पाटील यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment