हाडवळे यांची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

हाडवळे यांची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड

 हाडवळे यांची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, नामदार बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत सौरभ विठ्ठल हाडवळे यांची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया विद्यार्थी काँग्रेस  शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना सौरभ हाडवळे म्हणाले की, पक्षाचे विचार आणि महत्त्वाचे प्रश्नांवरील भूमिका वेळोवेळी जनसामान्य जनतेचे प्रश्न तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी तत्पर असेल. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष डॉ. एकनाथ गोंदकर, प्रदेश सचिव प्रसाद शेळके, शहराध्यक्ष काँग्रेस सचिन चौगुले, मा.नगरसेवक सुरेश आरने, अमृत गायके, स्वराज त्रिभुवन, शहर उपाध्यक्ष आरबाज कादरी, मोहसीन सय्यद, ता यु उपाध्यक्ष मदन मोकाटे, ऍड. अविनाश शेजवळ, मंगेश खाकाळे, शहर संघटक सुवरनेश् साबळे, समीर शेख, कृष्णा गायकवाड, शिवाजी भोंडगे व सर्वे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here