मुलभुत सुविधांबरोबर मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न ः महापौर शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

मुलभुत सुविधांबरोबर मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न ः महापौर शेंडगे

 मुलभुत सुविधांबरोबर मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न ः महापौर शेंडगे

श्री हरि हरेश्वर मित्र मंडळाच्यावतीने महापौर सौ.शेंडगे यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गेल्या 20 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधी आम्ही केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे नागरिकांनी आम्हाला सातत्याने मनपात निवडून दिले. त्यामुळे नागरिकांचे मोठे ऋण आहे, या ऋणात राहुन आपणास त्यांची सेवा करावयाची आहे. आज सर्वांच्या सहकार्याने महापौर म्हणून आपली झालेली निवड ही प्रभागाचा सन्मान आहे. त्यामुळे  नगर विकासाबरोबरच प्रभागाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. महापौर पदाच्या माध्यमातून प्रभागात मोठे प्रकल्प उभारण्याचा मानस असून, आता या पुढील काळात नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जातील. एक-एक प्रभागाचा विकास झाल्यास शहराचाही विकास होत असतो. त्यामुळे शहरातील मुलभुत सुविधांबरोबर मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न राहील. प्रभागातील नागरिकांचे नेहमीप्रमाणेच सहकार्य राहील. आज प्रभागातील नागरिकांनी केलेल्या सन्मान हा घरातील असून अशा सत्कारामुळे काम करण्यास प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.
बागरोजा हडको येथील श्री हरि हरेश्वर मित्र मंडळाच्यावतीने महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय शेंडगे, केतन गुंदेचा, बबन गोसके, गणेश क्यातम, बाळासाहेब व्यापारी, गणेश पिस्का, गणेश वाघ, प्रशांत देवळालीकर, संदेश कवाष्टे, अस्लम शेख, सुनिल शिदोरे, अनिल नागपुरे, जितेंद्र शिरसाठ, विनोद बोराटे, राजू वराळ, गजेंद्र कवाष्टे, चंद्रशेखर वांढेकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी केतन गुंदेचा म्हणाले, माजी नगरसेवक संजय शेंडगे व नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात विविध विकास कामांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांनाही त्यांना सातत्याने निवडून दिले आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून आता आमच्या प्रभागाला महापौर मिळाले. प्रभागाच्या विकासाबरोबर शहराच्या विकासात त्या आपल्या कामाने चांगला कारभार करतील, अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संदेश कवाष्टे, विनोद निमसे, बाळासाहेब कर्हाड, अभिजित दिवटे, नितीन देवळालीकर, सुनिल कदम, सुनिल शेंडगे, विनोद शेंडगे, ओंकार लोंढे, गजेंद्र कवाष्टे, धनंजय रसाळ, गिरिष सोनी, जय गुंदेचा, शाम सासवडकर, राम सासवडकर, संदिप शेंडगे, उमेश आहेर, मंगेश डवरे, सुशांत डवरे, श्रीनिवास कोडम, मनोज मिसाळ, विकी मिसाळ, दिलीप पाटील, तिरुपती नक्का, सुबोध रसाळ, दिपक धाडगे, जालिंदर बेरड, गौरव शेळके, मुदसर शेख, सोनवणे, डवरे, परदेशी, कुमार बेरड, गोरे आदिंसह हरिहरेश्वर महिला भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, युवकवर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment