निराधार कुटुंबास राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा आधार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

निराधार कुटुंबास राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा आधार

 निराधार कुटुंबास राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा आधार


नगरी दवंडी/ शहर प्रिंतनिधी
शिर्डी ः राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या अथक मेहनतीने साठीतल्या एका निराधार आजीबाईला आपल्या साठ वर्षाच्या जीवनकाळात पहिल्यांदाचं मिळाली शिधापत्रिका मिळवून दिली आहे.
यावेळी राहाता  तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, तलाठी तसेच पुरवठा शाखेतील कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके, तालुका उपाध्यक्ष विजय भाऊसाहेब काकडे, तालुका संघटक वसंतराव काळे, तालुका समन्वयक जगन्नाथ सरोदे, दिव्यांग क्रांती राहाता तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राजपूत, महादू कांदळकर यांच्या विशेष प्रयत्नांतुण या निराधार आजीबाईस रेशनकार्ड मिळण्यास यश मिळाले आहे

No comments:

Post a Comment