शहर विकासाच्या निधीसाठी मुंबई येथे यावे- पालकमंत्री हसन मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

शहर विकासाच्या निधीसाठी मुंबई येथे यावे- पालकमंत्री हसन मुश्रीफ

 शहर विकासाच्या निधीसाठी मुंबई येथे यावे- पालकमंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्र्याच्या हस्ते महापौर व उपमहापौर यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापौर मा.सौ.रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी आज पालकमंत्री मा.ना.श्री.हसन मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी पालकमंत्री यांनी दोघांचा सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी  उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. पुढील आठवडयात मुंबई येथे येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, नगरसेविका मा.सौ.पुष्पाताई बोरूडे, माजी महापौर मा.सौ.सुरेखाताई कदम, मा.सौ.सुवर्णाताई गेणप्पा, मा.श्री.अजिंक्य बोरकर, मा.श्री.भा कुरेशी, मा.श्री.राजेंद्र दळवी, मा.श्री.बाळासाहेब जगताप, मा.श्री.अनुप काळे, मा.श्री.संतोष भोसले, श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते.
मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे  व मा.उपमहापौर श्री.गणेश भोसले यांनी अमृत योजनेचे भुयारी गटर योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते खोदाई झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले होते. त्याचा नागरिकांना त्रास होत होता. यासाठी शहरातील रस्ते दुरूस्ती व नविन रस्ते विकसीत करण्यासाठी रक्कम रूपये 5 कोटी निधी मिळणे बाबत मागणी पालकमंत्री मा.ना.श्री.हसन मुश्रीफ यांचेकडे केली.

No comments:

Post a Comment