बोल्हेगाव हे विकसित उपनगर बनवणार- कुमारसिंह वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

बोल्हेगाव हे विकसित उपनगर बनवणार- कुमारसिंह वाकळे

 बोल्हेगाव हे विकसित उपनगर बनवणार- कुमारसिंह वाकळे

बोल्हेगाव येथील शिवकॉलनीतील पाण्याचा प्रश्न लोकवर्गणीतून मार्गी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव, नागापूर हा भाग पूर्वी ग्रामपंचायत मध्ये होता आता हा भाग महापालिका हद्दीत आला आहे.परंतू या भागाच्या मूलभूत प्रश्नापासून काम सुरू करावे लागले,गेल्या सात वर्षांपूर्वी या भागाचा नगरसेवक झालो परंतु अनेक विकासाची कामे प्रलंबित होती ही कामे मार्गी लावण्यासाठी नागरिकांना व मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मनपाची आर्थीक परिस्थिती बिकट असताना सुद्धा याभागच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, याचा बरोबर आ.संग्राम जगताप यांच्या याच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागल्यामुळे बोल्हेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे या भागात वास्तव्यास असणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागत आहेत.महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तातडीने पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे प्रश्न ताबडतोब मार्गी लागत नाही यासाठी मी व नागरिक लोक वर्गणीतुन निधी गोळा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहोत बोल्हेगाव भागातील शिवनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोकवर्गणीतून मार्गी लावला आहे. भविष्यकाळात बोल्हेगाव हे विकसित उपनगर बनविनारच आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन, नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केले.
बोल्हेगाव परिसरातील शिवकॉलनी येथे लोकवर्गणीतून पिण्याच्या पाण्याच्या लाईनचा लोकार्पण सोहळा नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक ड. राजेश कतोरे, शिवाजी राजापूरे, अजित साव, लक्ष्मण जगधने, आदेश पाराधे, भालचंद्र पाटील, सतिष जवरे, शिवाजी पवार, गजानन अकोलकर, बच्चू काते, राजेंद्र सप्रे, कैलास गुंजाळ, राजू भोगे, संजय गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजी राजापुरे म्हणाले की, बोल्हेगाव परिसरात नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून मोठी विकास कामे सुरू आहेत त्यामुळे या भागामध्ये आमच्यासारखे हजारो नागरीक राहण्यासाठी येत आहे. कोणतेही काम सांगितले की, ते मार्गी लावण्याचे काम नगरसेवक कुमारसिंह वाकळे करतात,आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता आमच्या महिलांना दूरवरून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी जावे लागत होते परंतु तो आता प्रश्न नगरसेवक वाकळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here