विकासाचे व्हिजन असलेला नगरसेवक म्हणून गणेश भोसले यांची ओळख- खा.विखे
खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उपमहापौर गणेश भोसले हे अहमदनगर महानगर पालिकेच्या माध्यमातून शहर विकासाचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील विकास कामासाठी होईल,विकासाचे व्हिजन असलेले नगरसेवक म्हणून गणेश भोसले यांची ओळख आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भोसले हे वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही संकल्पना त्यांच्या प्रभागात राबवितात आता ही संकल्पना, नगर शहरात राबविणार आहे. या कामासाठी आमचे सहकार्य राहील व नगर शहर हरित शहर म्हणून ओळखले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, शहर विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला शहरातील प्रश्न मार्गी लावू, चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आ. संग्राम जगताप व खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करू असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment