मंदिरात सापडले स्त्री जातीचे अर्भक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

मंदिरात सापडले स्त्री जातीचे अर्भक

 मंदिरात सापडले स्त्री जातीचे अर्भक

नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टीः तालुक्यातील  कडा धामणगाव, येथील रस्त्यावरील देवीनिमगाव येथील देवीच्या मंदिरात  दहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळुन आले. दि.8 जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरनातील मातेचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे मंदिर देविनिमगाव  येथे जगदंबा देवीचे मंदिर कडा, धामणगाव या रस्त्यावर आहे. बिटु पोकळे यांनी मंदिरात बाळ रडल्याचा आवाज येत असल्याची  माहिती पोलिसांना दिली तात्काळ आंभोरि पोलीसांनी घटनास्थळी जाऊन बेवारस टाकलेल्या अर्भकाची पाहणी केल्यास श्री जातीचे अर्भक दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून बाळाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याप्रकरणी अंभोरा पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment