कोविड काळातील ‘होगानास’ कंपनीचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाधिकारी डॉ. भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

कोविड काळातील ‘होगानास’ कंपनीचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाधिकारी डॉ. भोसले

 कोविड काळातील ‘होगानास’ कंपनीचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाधिकारी डॉ. भोसले

जिल्हा रुग्णालयात 18 लाख रुपयांचे तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सुपूर्त


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना संसर्ग विषाणूंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यांना आरोग्य सेवा व आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतून एमआयडीसी येथील होगाणास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वर्षभर कोरोना संकट काळामध्ये केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आज तीन व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केली आहे. याचा उपयोग जिल्हाभरातील आरोग्य सेवेला नक्कीच तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर होईल, जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सक्षम पणे तयार आहे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.
एमआयडीसी येथील होगानास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने जिल्हा रुग्णालयास सुमारे 18 लाख रुपयांचे तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले  यांच्या हस्ते सुपूर्त केले यावेळी कंपनीचे प्लांट हेड डॉ.शरद मगर, एच आर हेड सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ.सोनाली बांगर, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.
कंपनीचे प्लांट हेड डॉ.शरद मगर म्हणाले की,कोरोना संकट काळामध्ये मानवतेच्या भावनेतून मदतीचा हात देण्याचे काम होगानास कंपनीने केले आहे. कंपनीच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये 48 हजार गरजूंना भोजनाची व्यवस्था केली होती याच बरोबर चिचोंडी पाटील येथील आरोग्य केंद्रास 35 बेड उपलब्ध करून दिले याचबरोबर अनामप्रेम संस्थेलाही 35 बेडेची मदत केली आहे,बुर्‍हानगर येथील आरोग्य केंद्रास 25 हजारांची कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या दुसर्‍या  लाटेतही या वर्षी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल मध्ये 26 लाख रुपये खर्च करून ऑक्सीजन प्लांट निर्मितीचे काम सुरू आहे,हा प्लांट तिसर्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरेल.आज जिल्ह्यातील गोरगरीब कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता भासू नये यासाठी जिल्हारुग्णांलयास सुमारे 18 लाख रुपये किंमतीचे तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असे ते म्हणाले. नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here