शिक्षिकांचा ज्ञानज्योती उपाधी देऊन गौरव... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

शिक्षिकांचा ज्ञानज्योती उपाधी देऊन गौरव...

 शिक्षिकांचा ज्ञानज्योती उपाधी देऊन गौरव...

गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे संपादित जीवन प्रवास ज्ञानज्योतींचा व ज्ञानजागर पुस्तकाचे प्रकाशन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सौ.सुलोचना पटारे-पुरनाळे यांनी संपादित केलेल्या जीवन प्रवास ज्ञानज्योतींचा व ज्ञानजागर या काव्यसंग्रह पुस्तकांचे प्रकाशन नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा ज्ञानज्योती उपाधीद्वारे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे हे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  उपसभापती किशोर जोजार,सदस्य बाळासाहेब सोनवणे, गटविकास अधिकारी शेखर शेलार,गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे-पुरनाळे,कवियत्री संगिता फासाटे,शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे, प्रकाशक नितीन गायके व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी शिक्षिका सुप्रिया झिंजु्र्डे यांनी ईशस्तवन सादर केले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. शिक्षिका सुरेखा गायकवाड यांनी स्वागतगीत म्हटले.यावेळी शिक्षिका सुमन तिजोरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी जीवन प्रवास ज्ञान ज्योतींचा व  ज्ञानजागर पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीमती चंदना सोनवणे यांच्या वाडी ते गुगल क्लास रुमचे उदघाटन यावेळी करण्यात आले.तसेच भालगाव जिल्हा परिषदे शाळेच्या शिक्षिका सुनीता निकम यांच्या घरोघरी शाळा या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी शिक्षिका वृषाली घोडके व शांता मरकड यांनी माझा जीवन प्रवास व ज्ञान जागर या विषयी मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले.तर यावेळी लेक वाचवा लेक शिकवाया विषयावर झालेल्या काव्यवाचन,भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर निबंध स्पर्धेतील यशस्वी ज्ञानज्योतींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर जीवन प्रवास ज्ञानज्योतींचा वज्ञानजागर प्रकाशनाचा उद्देश व आजची गरज याविषयी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलोचना पटारे-पुरनाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात सभापती रावसाहेब कांगुणे यांनी ऑनलाइन शिक्षण उपक्रमामुळे शिक्षण विभागाचा दर्जा गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुधारला असून यासाठी शिक्षिका व शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे नेवासा तालुक्याची शान वाढली असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानज्योती शिक्षिका रुपाली वाघुले व चंदना सोनवणे यांनी केले.तर ज्ञानज्योती सुनीता कर्जुले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.यावेळी शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी विद्यादेवी सुंबे,समी शेख,मदन लाड, महादेव घोडके,सचिन बेळगे, गणेश लाड,ज्ञानदेव जाधव, अय्युब सय्यद,हाफीजोद्दीन शेख,कबीर पठाण,ज्ञानज्योती शीतल झरेकर,शिक्षक राहुल आठरे यांच्या सहज्ञानज्योती शिक्षिका उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment