महागाई विरोधात युवक काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

महागाई विरोधात युवक काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा...

 महागाई विरोधात युवक काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः केंद्र सरकारने निर्माण केलेल्या महागाई विरोधात श्रीगोंदा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध म्हणून शहरातील सिद्धेश्वर चौक पासून काळकाई चौक, होनराव चौक, रविवार पेठ मार्गे  तहसिल कार्यालयापर्यन्त बैलगाडी मोर्चा काढून सरकारचा निषेध करत महागाई त्वरीत कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा या करिता श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले. या आंदोलनास शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या मोदी सरकारने बड्या उद्योगपतींच्या धोरणानुसार सरकारचा गाडा हाकायला सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हापासून हे मोदी सरकारने सामान्य जनतेवर अन्याय करणारे निर्णय लादण्यास सुरुवात केलेली आहे. कोणतीही जनतेच्या हिताची, विकासाची कामे आजपर्यंत या सरकारने केलेली नाही. सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. महागाई म्हणजे विकास  अशी या मोदी सरकारची धारणा झालेली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, खाद्यतेल, डाळी, औषधे, खते, बी- बीयाणे यांच्या किंमती भरमसात वाडवून ठेवल्या असून गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. किंमत इतकी वाढली तर जनतेला उपाशी पोटी झोपावे लागेल  याची देखील या सरकारला कुठलीच चाड राहिलेली नाही. मोदी सरकरने सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या . परंतू प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली आहे. असे सांगितले. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रीम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करीत आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीगोंदा तालुका व शहर युवक काँगेस पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात येऊन सरकारचा निषेध करत महागाई त्वरीत कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा या करिता श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष गोरख बायकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, योगेश मेहेत्रे, सागर कोथिंबीरे, संदीप उमाप, संदीप वागस्कर, नितिन खेडकर, विजय खेतमाळीस, निलेश वागस्कर यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here