गुंडेगाव वनश्रेत्रात निसर्गाचे सौंदर्य खुलले... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

गुंडेगाव वनश्रेत्रात निसर्गाचे सौंदर्य खुलले...

 गुंडेगाव वनश्रेत्रात निसर्गाचे सौंदर्य खुलले...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील 850 हेक्टर वर वनक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या परीसरात  निसर्ग सौंदर्य खुलले असून झाड, फुल, लहान लहान झरे यांना बहर आला आहे.
परंतु सदर परिसरात कोरोना च्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.  वनक्षेत्रातील प्राचीन काळातील हेमाडपंथी  शुढ्ळेश्वर मंदिर, गोसावी मंदिर, कोथुळ खंडोबा मंदिर परीसर निसर्गसौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे.
दरम्यान तालुक्यात फारसा पाऊस नसला तरी सुरवातीच्या पाऊसामुळे येथील निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. जुन महिन्याच्या प्रारंभीस पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर उघडीप दिलेल्या पाऊसाने चांगली झालेली नाही. परंतु गुंडेगाव  येथील डोंगर, निसर्ग खुललेला असून हा खुललेला निसर्ग पाहण्यासठी  बहर आला आहे. गुंडेगाव गावच्या  परिसरात निसर्ग सहलींसाठी येणार्‍यांना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल असून हौशी पर्यटकांवर कडक करवाई करण्यात येणार आहे.
दरवर्षी या वनक्षेत्रात  पर्यटकांची गर्दी दिसून येते परंतु यंदा मात्र करोना संकटामुळे वनविभागाने  पर्यटकांना पर्यटनास मनाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here