अहमदनगर महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

अहमदनगर महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

 अहमदनगर महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालयाच्या विभागातील धनश्री जाधव, ओंकार भस्मे, एयेशा सय्यद, प्रकाश जगताप, वैभव निकरड, तुषार पांडुळे, शुभम येलजले, फहीम मेहम्मद खान यांची     ऑनलाईन कॅम्प्स् इंटरव्यूव्दारे ‘ इन्फोसिसए, टी.सी.एस, कोगनिझंट, इनसोनो, विप्रो,’ या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.
‘इंजिनिअर’ म्हणून सर्वांची निवड झाली असून त्यांना वार्षिक 2.60 चे पॅकेज मिळालेले आहे. कंपनीने निवड प्रक्रियेमध्ये अ‍ॅप्टीट्युड परिक्षा टेक्नीकल व एच.आर.मुलाखत हे राऊंड घेतले गेले, या सर्व राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे बाजी मारत यश मिळविले. प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले कि, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना सर्व गोष्टींचा विचार करुन त्यांना परीपुर्ण शिक्षण दिले जाते. जेणे करुन त्यांना भविष्यात कुठेही कोणतीही अडचण निर्माण होऊन नये. उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक करत असतात, त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा कल असतो, त्यातच महाविद्यालयाची प्रगती आणि चांगले शिक्षण देणारा महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे, कोरोना जरी असला , तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन क्लास घेऊन शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना उपस्थित होणार्या विविध प्रश्न ऑनलाईन मार्गदर्शन क्लासच्या माध्यमातुन सुटत आहे. शिक्षणात कोणताही खंड पडू देत नाही, त्यामुळ विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, असे सांगून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील कार्याचे शुभेच्छा दिल्या.
यावेळी चिफ कॉर्डिनेटर डॉक्टर एन. आर. सोमवंशी, उपप्राचार्य डॉ.बी. एम. गायकर, डॉ सय्यद रझाक, डॉ अरविंद नागवडे आणि प्रबंधक दीपक अल्हाट उपस्थित होते.

No comments:

Post a Comment