अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमधून युवकांनी प्रेरणा घ्यावी ः ससाणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमधून युवकांनी प्रेरणा घ्यावी ः ससाणे

 अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमधून युवकांनी प्रेरणा घ्यावी ः ससाणे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लोकप्रबोधनकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदीनाचा कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा मंच व मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने तिसगाव येथे संपन्न झाला.
प्रथमतः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप ससाणे, तालुकाध्यक्ष अंबादास शिंदे,मानवहित लोकशाही पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष रॉयल शिंदे, विकास साठे, सुशांत नवगिरे,उद्योजक विक्रांत पाथरे, आकाश शिंदे, अजित शिंदे, सतीश शिंदे, चिंटू शिंदे,जॉन शिंदे आदींसह सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.
  यावेळी बोलताना प्रदीप ससाने म्हणाले की,ज्या प्रमाणे दीन दुबळ्या कष्टकरी वर्गासाठी घटकांसाठी अण्णा भाऊंनी लढा दिला त्याच प्रमाणे आज या कोरोनाच्या महामारीच्या संकटसमयी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गोरगरीबाला आधार देण्याची गरज आहे.अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि विचार सर्वांना दिशादर्शक असुन त्यांच्या कार्य आणि विचारामधून युवकांनी प्रेरणा घ्यावी.
पुढे रॉयल शिंदे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्य संपदाचे वाचन होणे गरजेचे असुन युवकांनी वाचन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा मंच आणि मानवहित लोकशाही पक्ष यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here