संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास मोक्का लावणार.- मनोज पाटील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास मोक्का लावणार.- मनोज पाटील

 संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास मोक्का लावणार.- मनोज पाटील

क्राईम अ‍ॅन्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीममध्ये नगर जिल्हा पहिला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गुन्ह्यांची नोंद, पुराव्याचे संकलन करून न्यायालयात गुन्हेगारास शिक्षा होईल असे भक्कम दोषारोपपत्रासह विविध 42 प्रणालींचा समावेश असणारी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (ललींपा) प्रणालीमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकाविला असून वाळू तस्करीसह, चोर्‍या, घरफोड्या, दरोडे असे संघटीत गुन्हे करणार्‍या 387 टोळ्यांवर कारवाईचा बडगा पोलीस प्रशासनाने उगारला असून या टोळ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास त्यांना मोक्का लावण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिला आहे.
नगर जिल्हयामधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी  टु प्लस योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्याची महिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
नगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षक  पाटील यांच्या संकल्पनेतून नगर जिल्हयात जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली. या योजनेसाठी नगर जिल्हयामध्ये मालाविषयक, शरीरविषयक तसेच वाळुविषयक असे प्रकारचे गुन्हे करणारे व ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश करण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली. दिनांक 15 जानेवारी 2015 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीएनएस प्रणाली सुरु झालेली असून त्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील संपूर्ण सदर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या प्रणालीमध्ये 1 ते 21 फॉर्मची विभागणी केली असून त्यांना सी आय डी कडून मासिक गुण देण्याची पद्धत आहे. उएड चजछढकङध डणउउएडड डढजठध + उढढखनएछ डएठतखउएड या सर्वांचे महाराष्ट्र पोलीस विभागातून गुणांकण करण्यात येते असे ते म्हणाले. या गुणांकनात मार्च व एप्रिल मध्ये नगर जिल्हा तिसरा तर मे महिन्यात राज्यात पहिला आला आहे.
या योजनेची नगर जिल्हयामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधित टु प्लस योजनेसाठी लागणारी माहीती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलीस अधिक्षक पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर येथे एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची टु प्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मालाविषक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची 2011 पासूनची माहीती संकलित करण्यात आली तसेच शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची 2015 पासुन माहीती संकलित करण्यात आली. संकलित केलेली माहीती टु प्लस पथकांमार्फत टु प्लस योजनेच्या बेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. नगर जिल्हयामध्ये जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस 3841 (मालाविषयक 1914, शरीरविषयक -1927) आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करुन त्यांची संकलित केलेली माहीती टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.
तसेच जानेवारी 2021 पासुन दैनंदिन अटक आरोपीमधुन नव्याने 437 (मालविषयक 214, शरिरविषयक 223) आरोपी निष्पन्न करण्यात आले असून आजपोवतो 4278 आरोपी वेबसाईटवर भरण्यात आले आहेत.अहमदनगर जिल्हयामध्ये जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस 4278 आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करण्यात करुन अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी, यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपींचे मेळावे घेण्यात आले व यापुढे गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास अन्य कायदेशीर कारवाईची जाणीव करून देण्यात आली.
मे 2011 मध्ये अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शननुसार महाराष्ट्रातील एकूण 48 युनिटमधून नगर जिल्हयाचा गुणांकणानुसार 211 गुणापैकी 197 गुण व 93 टक्के मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. माहे मार्च 2021 व एप्रिल मध्ये अनुक्रमे तिसरा क्रमांक प्राप्त झालेला होता. तसेच माहे मे 2021 मध्ये कसोशीने प्रयत्न करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे असे ते म्हणाले.
या उत्कृष्ट कामगिरीकरीता. पोलीस अधिक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक  अनिल कटके नगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालयामधील कार्यरत सीसीटीएनएस विभागाचे आर डी बावकर,  एस एस जोशी, ए के गोलवड मपोना/1459 आर ही  एस एस काळे , के पी दुबे , एस ए भागवत , टी एल दराडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच सर्व उप विभागीय कार्यालयातील सीसीटीएनएस अँडमीन, सर्व पोलीस स्टेशन सीसीटीएनएस अँडमीन इंजिनिअर  अंबादास शिंगे यांनी कसोशीने प्रयत्न करून संपूर्ण महाराष्ट्रात नगर जिल्हयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
महिलाबाबत दाखल अत्याचाराच्या गुन्हयांचे वेळेत (60 दिवसाच्या आत तपास पुर्ण होइन सीसीटीएनएस प्रणाली मधे समाविष्ट होतील याकरिता गृह मंत्रालयाने दि.24/2018 रोजी आयटीएसएसओ खर्पींशीींळसरींळेप ढीरलज्ञळपस डूीींशा ऋेी डर्शुीरश्र जषषशपलशी ) पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तुलनात्मक तक्ता दर्शविण्यात येतो. त्याचे अनुपालन करून महिला-बालकाविरुद्ध द्वारा अत्याचाराच्या गुन्हयांचे वेळेत प्रणाली अंतर्गत दाखल करून नगर जिल्याचा तपास प्रक्रिया अग्रस्थानी आहे.
नवे हिस्ट्रीशीट केले तयार ः-
टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ठ असलेले मालाविषयक गुन्हे करणारे यातील प्रोफेशनल / सराईत व्यवसायिक गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हयातील 451 सराईत गुन्हेगारांचे नवीन हिस्ट्रीशीट उघडण्यात आले आहे. जिल्हा अभिलेखावरील जुने 167 हिस्ट्रीशिटर्स पैकी अक्रियाशिल 82 हिस्ट्रोशिटस कमी करण्यात आले असुन आजपावेतो नवीन व जुने असे एकुण 451+85= 536 हिस्ट्रीशीट अहमदनगर जिल्हा अभिलेखावर क्रियाशिल आहेत.
गुंडा रजिस्टर तयार ः-
तसेच टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ट असलेले शरीरविषयक गुन्हे करणारे गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी नवीन 517 गुंडांना गुंडा रजिस्टर मध्ये सामाविष्ठ करण्यात आले असून जिल्हा अभिलेखावर जुने 901 गुंडापैकी अक्रियाशिल असे 209 गुंड गुंडा रजिस्टरमधुन कमी करण्यात आले असून आजपावेतो नवीन व जुने असे एकूण 517 + 692 मिळून 1209 गुंड अहमदनगर पोलिसांच्या अभिलेखावर आहेत.
प्रतिबंधक कारवाई :-
अहमदनगर जिल्हा अभिलेखावरील टु प्लस योजनेत सामाविष्ठ आरोपीविरुद्ध सीआरपीसी 110/107 नुसार 1422 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
टू प्लस योजनेतील शरिराचे गुन्हेगारांतुन 142 टोळया निष्पन्न करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार ऑक्टोबर 2020 पासून आजपावेतो 13 प्रस्ताव प्राप्त झाले असून 4 क्रियाशिल गुन्हेगारी टोळींना हद्दपार करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment