छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार.

 छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार.

गृह विभागाने दिली परवानगी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः फेब्रुवारी 2018 मध्ये माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करून वाद घातले होते. छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. आता या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे.
शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम 196 (1) अ प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे येत्या दोन दिवसात छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.

No comments:

Post a Comment