नगरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करावेत- उद्धव ठाकरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

नगरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करावेत- उद्धव ठाकरे.

 शिवसेनेमुळे महापौरपदाचा मान - रोहिणी शेंडगे.

नगरच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करावेत- उद्धव ठाकरे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला महापौर पदाचा मान फक्त शिवसेनेमुळे मिळाला आहे. या पदाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न करु. त्याचबरोबर नगर शहरात मोठ-मोठे विकास प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. त्यासाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री या नात्याने आपण यात सहकार्य करा. आपल्या माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध होऊन नगरचा विकास साधला जाईल. असा विश्वास नगर महापालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य शासनाच्या विविध योजना महानगरपालिकेसाठी आहेत, अशा योजनांचा लाभ आपण घ्यावा. आपल्या कार्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री म्हणून सदैव पाठिशी राहिल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव ठाकरे यांनी नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांना दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेची कामे होण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सत्तेपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना महत्व दिले गेले आहे, हाच शिरस्ता यापुढेही सुरु राहिल. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष सत्तेत आहे. या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आपणास मिळत आहे. नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सौ.रोहिणी शेंडगे या विराजमान झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. या पदाच्या माध्यमातून आपण नगरकरांची सेवा करुन पक्ष वाढीसाठी काम करावे. त्याचप्रमाणे आघाडीधर्मही पाळावा. नगरच्या विकासासाठी जे आवश्यक असणारे प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करावेत. त्यासाठी आवश्यक त्या निधींची तरतूद केली जाईल. असेही ते म्हणाले. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, माजी नगरसेवक संजय शेंडगे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment