खड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

खड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू!

 खड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू!

उपमहापौरांच्या सूचनेची आयुक्तांकडून दखल.
अमृत भुयारी गटार योजनेचे काम बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे सध्या चर्चेचा विषय आहे. केंद्र शासनाच्या अमृत भुयारी योजनेच्या कामांमुळे खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना पायी चालणे अवघड होत असल्याची जाणीव उपमहापौर गणेश भोसले यांना झाल्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांकडे या योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत बंद करण्याची सूचना केली होती. आयुक्तांनी या सूचनेची दखल घेवून खोदकाम झालेल्या ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. आज पासून खड्डे बुजविणे व पॅचिगचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे.मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते. पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे याची दखल उपमहापौर गणेश भोसले यांनी घेतली व आयुक्तांना हे काम बंद करण्याची सुचना केली. आज पासून अमलात आणण्यात येत आहे.
भुयारी गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.नागरिकांना पायीचालणेही कठीण झाले आहे.तरी अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या असता आज याची दखल घेत मध्यवर्ती शहरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी अमृत भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम केले आहे त्या-त्या ठिकाणी खड्डे बुजवणे व पॅचिगंचे काम सुरु केले आहेत.जोपर्यंत खोदकाम केलेले पॅचिगंचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुढील उर्वरित काम न करण्याचे सूचना आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या होत्या त्यानुसार आज कामाला शहरात ठीक-ठिकाणी सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment