साईबाबा संस्थान ट्रस्टने शिर्डी ग्रामस्थांचे जलद लसीकरण करावे : भाजपाची निवेदनाद्वारे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

साईबाबा संस्थान ट्रस्टने शिर्डी ग्रामस्थांचे जलद लसीकरण करावे : भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

 साईबाबा संस्थान ट्रस्टने शिर्डी ग्रामस्थांचे जलद लसीकरण करावे : भाजपाची निवेदनाद्वारे मागणी


नगरी दवंडी/शहर प्रिंतनिधी
शिर्डी ः कोरोना महामारीवर स्व-सुरक्षितता आणि लसीकरण हे दोनच उपाय सध्या उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनेतेचे विनामूल्य लसीकरण करण्याची केवळ घोषणाच केली नाही तर त्याची अंमलबजावणी देखील देशात सुरु आहे. शिर्डी शहरात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून लसीकरण चालू आहे परंतु त्यामध्ये शिर्डी शहरातील नागरिकांना लस मिळण्यात अडचन येत आहे. शिर्डी शहराची लोकसंख्या जवळपास चाळीस हजार आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 10 ते 12 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. काही दिवसात साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी उघड़नार आहे. त्यावेळी संसर्गाची भीती सर्वात जास्त शहरातील नागरिकांना आहे कोरोनाकाळात शिर्डीकरांची आर्थिक घड़ी जशी विस्कटली तसा त्याचा साईबाबा संस्थानच्या देणगीवर सुद्धा परिणाम झाला आहे. आपण जर लवकरात लवकर शिर्डीकरांचे लसीकरण पूर्ण केले तर साई मंदिरावर वारंवार येणारे निर्बंध पूर्णत: बंद होतील आणि शिर्डी पूर्वीप्रमाणे भक्तांनी गजबजून जाईल त्यामुळे लसीकरण करताना शिर्डीतील नागरिकांना प्राथमिकता देण्यात यावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याच्यावतीने साई संस्थान प्रशासनाकड़े करण्यात आली आहे. लसीकरणाबाबतचे निवेदन साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना देण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, बाळासाहेब ओस्तवाल, भाऊ भोसले, संपत जाधव, राजू गोंदकर, किरण बर्डे, पंडित गुडे, लखन बेलदार, गणेश सोनवणे, नरेश सुराणा, सचिन तनपुरे आदि उपस्थित होते. साई संस्थानने ग्रामस्थांच्या लसीकरणात खरंच पुढाकार घेतल्यास साई मंदिर लवकर खुलं करता येऊ शकेल मात्र याबाबत संस्थान प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे.

No comments:

Post a Comment