नुतन महापौर उपमहापौर यांच्या भव्य सत्कारासह शाळेचा वर्धापण दिन समारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 16, 2021

नुतन महापौर उपमहापौर यांच्या भव्य सत्कारासह शाळेचा वर्धापण दिन समारंभ

 नुतन महापौर उपमहापौर यांच्या भव्य सत्कारासह शाळेचा वर्धापण दिन समारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास करोरे प्रशालेचा 61 वा वधाृपन दिन व नुतन महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोलेसे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
महापौर रोहिणी शेंडगे यांचा सत्कार शालेय समितीच्या व्हाईस चेअरमन मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी दि.15 रोजी शाळेच्या प्रांगणात वर्धापण दिनानिमत्ताने नगरसेवक सुवर्णा ग्यानप्पा यांच्या विकास निधीतून शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्याचे साहित्य प्रांगणात बसविण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात महापौर यांनी शालेय परिसिराची पाणी करुन समाधान व्यक्त केले. भविष्यात शाळेला मदतीची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुवर्णा गेणप्पा यांनी महिला व बालकल्याण समितीच्या कामाकाजाविषयी माहिती देऊन शाळेसाठी मदत केली असुन भविष्यातही मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमास नगरसेवक शाम नळकांडे, गणेश कवडे, संतोष गेणप्पा, सचिन शिंदे, तसेच स्वकुळसाठी हितसंवर्धन मंडळाचे चीफ ट्रस्टी अरविंद धिरडे, खजिनदार, कृष्णा बागडे, ट्रस्टी सचिन मडके, बाबासाहेब वैद्य, गणेश झिंजे, महेश कांबळे, संजय दळवी, गणेश अष्टेकर, नरेंद्र बागडे, योगेश भागवात, प्रताप मारवडे, विठ्ठल पाठक, सुभाष पाठक, सुनील पावले, मालवंडे मॅडम, खोपे मॅडम, अभिजित अष्टेकर, निलेश मिसाळ, गणेश मानकर, अनुजा कांबळे आदीसह  महिला संचालिका सुरेखा शेकटकर, छाया साळी, वनिता पाटेकर, शुभदा वल्ली, शैला मानकर भक्तसेवामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि जिग्वेश्वर प्रतिष्ठान व जिग्वेश्वर तरूण मंडळाचे सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, ट्रस्टी संजय सांगावकर यांनी परिश्रम घेतले तर मुख्यध्यापिका कल्पा भामरे, कल्पना विकास जाधव, आणि सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते, सूत्रसंचालन जगन्नाथ कांबळे यांनी केले मानले तर आभार सुरेखा शेकटकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here