थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करू.

 थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करू.

उपमहापौर गणेश भोसले यांनी स्वीकारला पदभार..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आ. अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या मुळे उपमहापौर पदाची संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून शहर विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू तसेच कामाच्या माध्यमातून मनपाचे नावलौकिक वाढवू व हरित नगरचा संकल्प पूर्ण करू थोर महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करू आ. संग्राम जगताप यांचे विकासाचे स्वप्न आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करू असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
आज मनपाच्या उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी उपमहापौर गणेश भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सत्यशोधक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर म्हणाले की, नागरिकांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर शहर विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणार आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहर विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार त्याचबरोबर महापालिकेच्या कारभारास शिस्त लावणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणले की,उपमहापौर गणेश भोसले यांना महापालिकेच्या कारभाराचा मोठा अनुभव आहे.त्याच्या कामाचा उपयोग शहर विकासासाठी नक्की होईल याच बरोबर तरुण नगरसेवकाना त्याच्या कामाचा अनुभव मिळणार आहे. महापालिकेची महापौर व  उपमहापौरपदाची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आज चांगला संदेश शहरवासीयांना गेला आहे.यामुळे विकासाच्या कृतीला बळ मिळाले आहे, शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे आता लवकरच शहरातील डीपी रस्ते काँक्रिटीकरण कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल, शहरातील लाईटचा प्रश्न मार्गी लागेल याच बरोबर उद्याने,क्रीडांगणे विकसित करू उपमहापौर पदाच्या माध्यमातून भोसले कामाचे सोने करतील असे ते म्हणाले. यावेळी आ. संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, प्रा.माणिकराव विधाते, भा कुरेशी, अजिंक्य बोरकर, नगरसेवक सचिन शिंदे,अनुप काळे, संतोष भोसले, संजय चोपडा,संजय शेंडगे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, लताताई शेळके, बाबा खान,आसिफ सुलतान, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment