खरा देवदूत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

खरा देवदूत!

 खरा देवदूत!

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने...


डॉ
क्टर.. खर्‍या अर्थाने देवदूत. आपलं शरीराचं दुखणं.. मनाचं दुखणं.. हमखास बरा करणारा तज्ञ. पण आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘डॉक्टर’ या शब्दाची व्याख्या एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. डॉक्टर म्हणजे दिलासा... मनाला उभारी.. जीवनाची नवी उमेद.. असहाय्य वेदनेतून हमखास सुटका.. थोडक्यात.. आरोग्याची वाट सुलभ करणारा एक अवलिया... आज डॉक्टर दिनानिमित्त नगर जिल्ह्यातील डॉक्टरांना मनापासून शुभेच्छा
आजही गावखेड्यांत डॉक्टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत’ ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो.
सध्या भारतातील सर्वच डॉक्टर कोविड-19’ अर्थात कोरोना’विरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत. लॉकडाउन’च्या सुरवातीच्या काळातही आपण सर्वांनी थाळी, टाळी वाजवून या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तेव्हा आजच्या डॉक्टर्स डे’निमित्त सर्व डॉक्टरांना अनंत शुभेच्छा!
अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत’ ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. एक जुलै हा भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. त्यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. 1991 मध्ये केंद्र सरकारने या दिवशी डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करावा, असा निर्णय घेत सुरवात केली. चार फेब्रुवारी 1961 ला डॉ. बिधानचंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न’ बहाल करण्यात आला आहे.
डॉक्टरच्या कार्याला सलाम खरं म्हणजे आपल्या कौतुकासाठी शब्द कमी पडावेत असे काम डॉक्टर करीत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात जीवनदाता डॉक्टरांच्या कष्टामुळे सामान्यांना हा कठीण काळ सुसह्य होण्यास मोठी मिळाली आहे. डॉक्टरांचा असा एक दिवस असू नये कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का ? तो दररोज आपल्याला हवा असतो. आपण सारेचजण दीड वर्षापासून कोरोनाला हरविण्याच्या ध्येयाने लढतो आहोत. आपल्यासोबत आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. या सर्वाच्या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यात यश येत आहे. राज्यात पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट भीषण स्वरुपाची आली. डॉक्टरांनी गंभीर परिस्थितीत नागरिकांना उपचार दिले. त्यामुळे हजारोंचे प्राण वाचले. डॉक्टर जीवनदाते आहात मात्र काहीवेळा शोकमग्न नातेवाईकांकडून भावना अनावरण झाल्यास आपल्यावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनाही घडतात. त्यांचे समर्थन नक्कीच करता येणार नाही, अशा घटना निंदनीयच आहेत. जो आपल्या जीवाची बाजी लावून दुसर्‍याच्या प्राणाचे रक्षण करतो त्याच्या जीविताची हानी होईल असे कृत्य कोणीही करू नये,
कोरोनाच्या काळात सामान्यांना उपचार देताना काही डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्याची आवश्यकता आहे. राज्य सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविताना संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर गेला आहे. या कामी डॉक्टर्स त्यांच्या जोडीला असलेले नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टरांना पुन्हा एकदा खूप सार्‍या शुभेच्छा आणि धन्यवाद त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना.

No comments:

Post a Comment