खासगी इंग्रजी शाळांना फक्त शिकवणी फी घेण्याचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

खासगी इंग्रजी शाळांना फक्त शिकवणी फी घेण्याचे आदेश.

 खासगी इंग्रजी शाळांना फक्त शिकवणी फी घेण्याचे आदेश.

ऑनलाइन शिक्षण असताना इतर फी आकारणी कशासाठी?; मनसेच्या पाठपुराव्याला यश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण चालू असताना खाजगी इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांकडून मोठी फी आकारणी करत असल्याने मनसे सचिव नितीन भुतारे यांनी इतर फी रद्द करून फक्त शिकवणी फी घेण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. या मागणीचा विचार करून शिक्षण अधिकारी यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक, मनपा प्रशासन अधिकार्‍यांची बैठक घेऊन या शाळांनी इतर कोणतीही फी न करता फक्त शिकवणी (ट्युशन) फी आकारण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी दिले असल्याची माहिती नितीन भुतारे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सूरु असतांना विद्यार्थ्यांनी कुठ्ल्याही प्रकारच्या शालेय सुविधांचा वापर केला नाही. तरी सुध्दा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक ज्या गोष्टी वापरात आल्या नाही त्या कॉम्पुटर, बस, ग्रंथालय, स्टेशनरी, इव्हेंट , प्रयोगशाळा तसेच ईतर फी विध्यार्थी पालकांना भरण्यास सांगत असून ते पालकांना मान्य नाही काही पालकांच्या अश्या प्रकारच्या तक्रारी मनसे कडे आल्यानंतर मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी एक वर्षापासून शिक्षणाधिकारी यांच्याकडेच या संबंधी पाठपुरा्यानंतर शिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासन अधिकारी यांनी अशोकभाऊ फिरोदिया शाळेत खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुख्याध्यापकांची बैठक घेऊन सर्व शाळांना शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आदेशाची प्रत दिली आहे.
शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या21 जुन 2021 च्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार फक्त लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी शाळेतील ईतर कुठल्याही सुविधांचा वापर केला नाही त्यामुळे खजागी शाळांनी ऑनलाइन शिक्षण दिल्यामुळे फक्त शिकवणी फी घ्यावी तसेच फी अभावी ऑनलाईन शिक्षण बंद करु नये विद्यार्थ्याना मोफत शिक्षण कायद्याअंतर्गत शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही याची महिती असावी.असे आदेश शाळांना दिले आहेत. तशी अमलबजावणी प्रशासन अधिकारी महानगरपालिका अहमदनगर तसेच शिक्षणाधिकारी अहमदनगर यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षण उपसंचालक पुणे, तसेच शिक्षणाधिकारी अहमदनगर प्रशासन अधिकारी अहमदनगर महानगरपालिका यांच्या आदेशानूसार खाजगी शाळांनी फी कमी केली नाही तसेच फी अभावी ऑनलाईन शिक्षण बंद केले तर मनसेचे नितीन भुतारे यांना मोबाईल नंबर 7304612121 या नंबर वर संपर्क करा. शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या आदेशाची प्रत सुध्दा पालकांना पाहिजे असेल तर मनसे देणार या पुढे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मनमानी चालूच राहिली तर मनसेच्या वतीने शाळांमध्ये आंदोलन करणार असा ईशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिला आहे. शिक्षण अधिकारी यांच्या दालनात बैठकित नितीन भुतारे यांचे समवेत मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment