आयुक्त साहेब ड्राइव इन लसीकरण त्वरित सुरु करा - श्रीनिवास बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

आयुक्त साहेब ड्राइव इन लसीकरण त्वरित सुरु करा - श्रीनिवास बोज्जा

 आयुक्त साहेब ड्राइव इन लसीकरण त्वरित सुरु करा - श्रीनिवास बोज्जा

जेष्ठ नागरिक व शारीरिक व्यंग असलेल्याना स्वतंत्र केंद्र सुरु करावे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जेष्ठ नागरिक व शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना रांगेत उभे राहून लस घेणे शक्य नसल्याने मुंबई महानगरपालिकेने अश्या व्यक्तींना ड्राइव इन लसीकरण ची व्यवस्था केली त्याप्रमाणे अहमदनगर येथे ही सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना मा. आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका यांना केली आहे.
अहमदनगर येथील अनेक लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक व शारीरिक अपंग व्यक्ती लसीकरणासाठी लाईनीत तासनतास उभे असलेले दिसतात व लस न मिळाल्यास पुन्हा दुसर्‍या दिवशी यावे लागते अश्या प्रकारे जेष्ठ नागरिकांचे लसीकरण साठी हाल होत असल्याचे दिसून येत आहे. जेष्ट नागरिक तसेच शारीरिक व्यंग असलेल्या नागरिकांना  प्रशासनाच्या प्रत्येक योजनेत सवलत दिली जाते त्याच प्रमाणे लसीकरणासाठी सुद्धा यांना वेगळे केंद्र उपलब्ध करून दयावे अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे. गेले चार ते पाच दिवस झाले अहमदनगर येथे लस उपलब्ध नसल्याने रोज नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन रांग लावतात व नंतर त्यांना कळवले जाते आज लसीकरण येणार नाही त्यामुळे नागरिकांचे विनाकारण हाल होत आहेत व या गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे. गेले चार ते पाच दिवसापासून लस अहमदनगर येथील केंद्रावर का उपलब्ध होत नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.वास्तविक पाहता अहमदनगर महानगरपालिका केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असतांना सिव्हिल हॉस्पिटल येथे लस उपलब्ध होते या बाबत महानगरपालिकेने स्पष्टीकरण करावे अशीही मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेने जेष्ठ नागरिक व शारीरिक व्यंग असलेल्या नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन या नागरिकांसाठी ड्राइव इन लसीकरणची व्यवस्था केली त्याच धर्तीवर ही व्यवस्था अहमदनगर येथे सुरु करावी  व याचे आदेश त्वरित मा. आयुक्त यांनी सर्व लसीकरण केंद्राना देण्यात यावे जेणे करून जेष्ठ नागरिकांचे हाल होणार नाही. असे निवेदनाद्वारे मा. आयुक्त, मनपा, अहमदनगर व मा. आरोग्यधिकारी, मनपा अहमदनगर यांना मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment